शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई ते पुणे आणि नागपूर विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

By गणेश वासनिक | Updated: October 6, 2024 14:34 IST

नागपूर-भुसावळ-नाशिक रोडदरम्यानही विशेष गाड्या चालवणार...

अमरावती : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाकडून धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ११ ऑक्टोंबर पासून मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नागपूर आणि नागपूर -भुसावळ - नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे. त्यामुळे नागपूर येथे दीक्षाभूमी येथे ये-जा करण्यासाठी बौद्ध बांधव, आंबेडकरी अनुयायांनी या विशेष गाड्यांनी प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.यात लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर अनारक्षित विशेष (०१०१७) ही गाडी मुंबई येथून रात्री २ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असणार आहे. नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१०१८) ही गाडी १३ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री वाजून २० मिनीटांनी सुटेल.एलटीटी मुंबई येथे त्याच दिवशी ७ वाजता पोहोचेल.नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१२१८) ही गाडी १२ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजून ५ मिनीटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी एलटीटी मुंबई येथे २ वाजून ३५ मिनीटांनी पोहोचल. सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबे असणार आहे.नागपूर-पुणे अनारक्षित विशेष (०१२१५) ही गाडी नागपूर येथून २३ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २० वाजता पोहोचेल. या गाडीला १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील.पुणे-नागपूर अतिजलद विशेष (०१२१६) ही विशेष पुणे येथून ११ ऑक्टोंबर रोजी १६ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. अजनी, सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा,मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन असे थांबे असतील.भुसावळ-नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष०१२१३ मेमू विशेष १२ ऑक्टोंबर रोजी भुसावळ येथून ०४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १२ वाजता पोहोचेल.०१२१४ मेमू विशेष १२ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून २३.४० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी १४.१० वाजता पोहोचेल. या मेमू ट्रेनला एक्सप्रेस स्थानकाचे थांबे असणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे