शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

'अमरावती ते अमजेर' विशेष ट्रेन, नवनीत राणांची मागणी मान्य; शिवसेनेचा जबर टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 19:52 IST

अजमेर शरीफ येथे होणाऱ्या ख्वाजा मोहिनोद्दीन चुस्ती (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन पाठवण्यात आली आहे

मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण मुद्द्यावरुन शिवसेनेविरुद्ध आंदोलन पुकारले होते. मुंबईती मातोश्री या निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता. त्यावेळी, झालेल्या आंदोलनानंतर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, शिवसेना विरुद्ध राणा असा वाद महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर, महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आता, खासदार राणा यांनी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे. त्यावरुन, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अजमेर शरीफ येथे होणाऱ्या ख्वाजा मोहिनोद्दीन चुस्ती (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन पाठवण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले होते. त्यानुसार, २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवरुन ही रेल्वेगाडी सुटली  आहे. दुसऱ्यादिवशी २७ जानेवारी रोजी सकाळी ६,४५ वाजता अजमेरपासून ५ किमी दूरवर असलेल्या दौजाई स्टेशनवर पोहोणार आहे. 

ख्वाजा गरीब नवाज यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना आरामादायी प्रवास घडावा, या हेतुने खासदार राणा यांनी ही मागणी केली होती. त्यास, रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली असून आज ही गाडी रवाना झाली आहे. दरम्यान, अजमेरहून परत येण्यासाठी २९ जानेवारी रोजी रात्री ७ वाजता दौजाई रेल्वे स्टेशनवरुन गाडी असणार आहे. जी गाडी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.१० वाजता अमरावती मॉडेल स्टेशनवर पोहोचणार आहे. 

दरम्यान, खासदार राणा यांच्या या मागणीपत्रावरुन शिवसेना खासदार मनिषा कायंदे यांनी ट्विटरवरुन राणा यांच्यावर निशाणा साधला. आहे. राणा यांच्या मागणीचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत, जय हनुमान ज्ञान गुण सागर... जय कपीस तिहु लोक उजागर..... असे म्हणत उपरोधात्मक टोला राणा यांना लगावला आहे.  

टॅग्स :ajmer-pcअजमेरrailwayरेल्वेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा