शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन निरीक्षक भरती

By admin | Updated: July 6, 2015 00:16 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापनेसाठी सरळसेवा वनरक्षक आणि वननिरीक्षक भरती प्रक्रिया ७ जुलैपासून सुरु होत आहे.

७ जुलैपासून धावचाचणी : चिखलदरा, धारणी तालुक्याला प्राधान्यअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापनेसाठी सरळसेवा वनरक्षक आणि वननिरीक्षक भरती प्रक्रिया ७ जुलैपासून सुरु होत आहे. पुरुष ५ तर महिलांसाठी ३ कि.मी. धावचाचणी घेतली जाणार आहे.सरळसेवा वनरक्षक भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा उमेदवारांची धावचाचणी घेतली जाईल. नागपूर राष्ट्रीय महा मार्गालतच्या औद्योगिक वसाहत, नांदगाव पेठ परिसरात धावचाचणी होणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी ७ व ८ जुलै तर महिला उमेदवारांसाठी ९ जुलै ही तारीख निश्चित झाली आहे. यावेळी ओळखपत्र अनिवार्य असून ते संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धावचाचणीत आवश्यक पोषाख, बूट व अन्य अनुषंगिक साहित्य आणण्याची सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे. ओळखपत्रासोबत शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आणणे अनिवार्य आहे. ओळखपत्रात नमूद तारीख व वेळेनुसार उमेदवार हजर न राहिल्यास चाचणीत सहभागी होता येणार नाही, असे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी सांगितले आहे. उमेदवारांना धावचाचणीनंतर भरती प्रक्रियेची माहिती संकेस्थळावर उपलब्ध होईल, असे वनविभागाने कळविले. ८१ वनरक्षकांच्या जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. चिखलदरा, धारणी तालुक्यातील स्थानिकांना यात प्राधान्य दिले जात आहे. तसेच वननिरिक्षकांच्या २७ जागा सरळसेवा भरती प्रक्रियेतून भरली जात आहे. यामध्ये आठ महिला, एक प्रकल्पग्रस्त अथवा धरणग्रस्त, भूकंपग्रस्त एक, माजी सैनिक चार, गुणवत्ता धारक खेळाडू एक, होमगार्ड एक, अंशकालीन तीन, रोजंदारी वनमजूर तीन तर सर्वसाधारण पाच असे एकूण २७ उमेदवारांची भरती प्रक्रियेतून वननिरीक्षकांची निवड केली जाईल.शासन निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया राबवलिी जात आहे. उमेदवारांना संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती पुरविण्यात आली आहे. धावचाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाली असून वनविभागाने इतर विभागाचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वननिरीक्षक, वनरक्षक सरळसेवा पदाची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.- नीनू सोमराज,उपवनसंरक्षक, अमरावती.