शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

एसपी ऑन रोड; पाच तास चालले ‘ऑपरेशन ऑल आऊट’, सिमेवर सशस्त्र नाकाबंदी

By प्रदीप भाकरे | Updated: October 8, 2023 18:36 IST

अचानकच राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर, जिल्हयातील राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने तथा सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

अमरावती: आगामी काळातील सार्वजनिक उत्सवादरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ या कालावधीत ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. अचानकच राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर, जिल्हयातील राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने तथा सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

गुन्हेगारांची आश्रयस्थाने, तडीपार आरोपी पकड़ वॉरंटमधील आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. ग्रामीण हद्दीतील धाबे, हॉटेल, लॉजेस, अवैध व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. मोहीमेदरम्यान मोर्शी येथील दरोडयाच्या गुन्हयात वान्टेड असलेल्या आरोपीकरिमोद्दीन नईमोद्दीन याला एलसीबीने अटक केली. तर, घनश्याम नंदवंशी (परतवाडा) व गोकुळ खंडारे (५२, रा. कोकर्डा) हे दोघे तडीपारीचा आदेश डावलून फिरताना दिसल्याने व रोहीत बेठे (अचलपुर), मोहन राऊत (पोरगव्हाण) व वैकुंठ वानखडे (रा. ब-हाणपूर) यांचेजवळ अवैध शस्त्र मिळून आल्याने त्यांच्याविरूध्द कार्यवाही करण्यात आली. मोहीमेदरम्यान एसपी अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, चार पोलीस उपअधिक्षक, ठाणेदार अशा एकुण ६६ पोलीस अधिकारी व ५७२ पोलीस अंमलदार मोहिमेत सहभागी झाले.२७८ गुन्हेगारांची तपासणीसचिन बेदरकर (कांडली), शेख इब्राहिम शे. मोहम्मद (अचलपुर) व आकाश इंगोले (अंजनगांव) हे रात्रीदरम्यान काहीतरी गुन्हा करण्याचे तयारीने फिरत असल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात आली आहे. पोलीसांचे अभिलेखावरील निगराणी बदमाश, मालमत्तेचे गुन्हे करणारे, शस्त्र अधिनियमान्वये गुन्हे दाखल असलेले, अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेले, गुटखा विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या एकूण २७८ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.१२१७ वाहनांची तपासणीऑल आउट ऑपरेशन दरम्यान १२१७ वाहनांची तपासणी करण्यात आली. ९० वाहनांचालकांना २१ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. अवैध दारुच्या ३२ केसेस करुन ५३,२३० रुपयांचा, अचलपूर, दर्यापूर, सरमसपुरा येथे गुटखा कारवाईच्या चार केसेस मध्ये ७९,३०० रुपयांचा, तसेच आसेगांव पुर्णा येथे अवैध रेती वाहतुकीचे अनुषंगाने एका प्रकरणात तीन लाखांचा मुदेमाल जप्त करण्यात आला. पकड वॉरंटमधील ३५ आरोपींना अटक करण्यात आली. ६४ जमानती वॉरंट व २२२ समन्स बजावणी करण्यात आली.

टॅग्स :Amravatiअमरावती