शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवरील खोडमाशी यंदाही ठरणार घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST

अमरावती : सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव उगवणीपासून कापणीपर्यंत राहतो व ६० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान करते. त्यामुळे सोयाबीन उगवण्याच्या १० ते ...

अमरावती : सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव उगवणीपासून कापणीपर्यंत राहतो व ६० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान करते. त्यामुळे सोयाबीन उगवण्याच्या १० ते १५ दिवसांत किडीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याचे पीकेव्हीच्या प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषिशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी सांगितले.

प्रौढ खोडमाश्या लहान चमकदार काळ्या रंगाच्या व लांबी दोन मिमी असते. अळी बिनपायाची फिक्कट पिवळी व ३ ते ४ मिमी लांब असते. कोषावस्थेत फांदी किंवा खोडात आढळते. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी प्रौढ माशीला बाहेर जाण्यासाठी खोडाला जमिनीलगत किंवा मोठ्या झाडाच्या वरच्या भागात छिद्र करते व हे छिद्र भुरकट लाल रंगाचे असते. मादी माशी पेशीत फिक्कट पिवळसर ८० ते ८५ अंडी घालते. यातील अळी १० ते १५ दिवस राहते. ७ ते १० दिवसांनी कोषावस्थेत जाते. कोष फिक्कट तपकिरी रंगाचे असतात. एकूण ११ ते १३ दिवसांत प्रौढावस्था पूर्ण होते.

खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या मुख्य शिरांद्वारे खोडात शिरतात व आतील भाग पोखरतात. खरिपात झाडे ९० ते १०० टक्के कीडग्रस्त होतात. झाडाची खोडे ७० टक्के पोखरल्याने पिकाचे नुकसान होत असल्याची माहिती कृषिशास्त्रज्ञ डॉ. सतीश निचळ व डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सांगितले.

बॉक्स

हे व्यवस्थापन आवश्यक

प्रत्येक क्षेत्रात आठ दिवसांत पेरणी आटोपून शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी रासायनिक बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झान ३० टक्के एफ.एस या कीटकनाशकाची १० मिली प्रतिकिलोप्रमाणे १ ते ८ दिवस अगोदर आपले सवलतीनुसार बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर १५ दिवसांनी फोमसिटचे किंवा रेडिमेड पिवळे चिकट सापळे एकरी ६४ याप्रमाणे आठ ते दहा मीटर अंतरावर लावावे.

बॉक्स

ही फवारणी आवश्यक

सोयाबीन पेरणीनंतर प्रथम थायमिथोक्झान १२.६ टक्के अधिक लाम्ब्डा सायहलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी हे २.५ मिली १० लिटर (५० मिलि/एकर) किंवा इथिऑन ५० टक्के ईसी हे ३० मिली हे १० लिटर (६००/मिलि/एकर) याप्रमाणे फवारणी करावी. ३० ते ३५ दिवसांनी दुसरी फवारणी क्लोरानट्रनिप्रोल १८.५ टक्के एससी हे ३ मिली १० लिटर पाण्यात किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के ईसी हे ६.७ मिलि याप्रमाणे करावी.

बॉक्स

चौथी फवारणी आवश्यक

६० ते ६५ दिवसांनी चौथी फवारणी इमामेकटिन बेंझोएट १,९ टक्के ईसी हे ८.५ मिलि १० लिटर पानी (१७० मिली/एकर) या प्रमाणे करावी. या फवारणीमुळे सोयाबीनवरील इतर किडींचेही व्यवस्थापन करता येते. हे प्रमाण १० लिटर पाण्याच्या साध्या पंपाचे आहे. पॉवर स्प्रेअरने फवारणी करायची झाल्यास कीटकनाशकाचे प्रमाण तीनपट करावे, असे अनिल ठाकरे यांनी सांगितले.