शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो! सोयाबीन उशिरा विका, पाशा पटेल यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 19:39 IST

येत्या काही दिवसांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बदलाचा मोठा परिणाम शेतमालावर जाणवणार आहे. परिणामी मालाला अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन उशिरा विकावे, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अमरावतीत रविवारी केले.

अमरावती : येत्या काही दिवसांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बदलाचा मोठा परिणाम शेतमालावर जाणवणार आहे. परिणामी मालाला अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन उशिरा विकावे, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अमरावतीत रविवारी केले. ते कृषी विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आले असता, पत्रपरिषदेत सरकारच्या कृषी धोरणावर बोलत होते.  पाशा पटेल, यांच्या माहितीनुसार, राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टरवर खरिपाचे पीक घेतले जाते. यात सोयाबीन, कपाशी ६५ ते ७० टक्के पेरा केलाजातो. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय धोरणाच्या परिणामामुळे सोयाबीन तेल, सोयबीन ‘डी आय केक’चे भाव गडगडले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकºयांना फटका बसला. सोयाबीनला खुल्या बाजारात भाव मिळाले नाही. मात्र, ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात धोरणात आमूलाग्र बदल केले आहे. चीन, अमेरिका, बांगलादेश, इराणला सोयाबीन निर्यातचा करार झाला आहे. पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये चीन येथील एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ते देशातील सोयाबीन आॅईल केंद्राची पाहणी करतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर हे तेलावर नव्हे, तर पेंडावर ठरतात. त्यामुळे सरकारने अर्जेटिंना, अमेरिका, चीन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त करारानुसार क्रूड आॅईल ड्युटीचे दर समान केले आहे. परिणामी येत्या काळात सोयाबीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असेल. शेतकºयांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये. शासनाने पणनच्या माध्यमातून तारण योजना सुरू केली आहे. सोयाबीन तारण ठेवताना शेतकºयांना ७० टक्के रक्कम सहा टक्के व्याज दराने घेता येईल. खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता तेजी, मंदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले. मूग, उडिदाची नोंदणी करण्याचा सूचना प्रशासनाला दिल्याचेसुद्धा पटेल यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, माजी महापौर किरण महल्ले, अनिल आसलकर, सतीश करेसिया, मनोहर सुने आदी उपस्थित होते.बांगलादेशात पाठविणार २०० रेल्वे रॅक सोयाबीन डी आॅईल केकच्या २०० रेल्वे रॅक बांगलादेशात पाठविल्या जाणार आहे. इराणनेदेखील मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनला सुगीचे दिवस येणार आहे. सोयाबीनसाठी जागतिक परिस्थिती तयार झाल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली. सोयाबीन डी आॅईल केकच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांना लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलFarmerशेतकरीAmravatiअमरावती