अंतिम टप्पा : दर्यापूर तालुक्यात १०२.७९ टक्के पेरणीअमरावती : तीन दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने खरिपाच्या पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्यास्थितीत ६ लाख ५२ हजार ८३६ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्या तुलनेत ८९.७ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यंदाच्या खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी दर्यापूर तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात ७० हजार ७६४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ७२ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. वरुड तालुक्यात ४८ हजार ६४६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४५ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ९४.४ टक्केवारी आहे. तिवसा तालुक्यात ४५ हजार ४४४ हेक्टर क्षेत्रापैकी ३८ हजार ४६ क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात ४२,६५१ हेक्टर क्षेत्रापैकी ३८,५१९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. चांदूररेल्वे तालुक्यात ४२,६५१ क्षेत्राच्या तुलनेत ३३,४४३ हेक्टर क्षेत्रात सध्या पेरणी झालेली आहे. चांदूरबाजार तालुक्यात ६०,९९७ हेक्टर क्षेत्रापैकी ५०,३२६ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. धामणगाव तालुक्यात ५५,४३८ हेक्टर क्षेत्रापैकी ५३,६८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. धारणी तालुक्यात ४६,६७२ हेक्टर क्षेत्रापैकी ४३,३३३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. (प्रतिनिधी)२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ३ लाख २३,३०० हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकासाठी प्रस्तावित असताना सद्यस्थितीत २ लाख ६९ हजार १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. सर्वाधिक २४,९४७ क्षेत्रात चांदूररेल्वे तालुक्यात पेरणी आटोपली. ही टक्केवारी आहे,तर सर्वात कमी १ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात वरुड तालुक्यात पेरणी आटोपली आहे.सद्यस्थितीत कपाशीची ८९ टक्के पेरणी यंदा कपासीसाठी एक लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्या तुलनेत सध्या स्थिती १ लाख ७२,२३२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झालेली आहे. ही ८९.११ टक्केवारी आहे. प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १६५.३ हेक्टर क्षेत्रामध्ये धारणी तालुक्यात कपाशीची पेरणी झालेली आहे, तर सर्वात कमी २५.७६ टक्के क्षेत्र नांदगांव खडेश्वर तालुक्याचे आहे.
साडेसहा लाख हेक्टरमध्ये पेरणी
By admin | Updated: July 17, 2016 00:09 IST