शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सोफियामुळे पेयजलाचे भविष्यकालीन संकट!

By admin | Updated: March 20, 2016 00:01 IST

जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पातील ८७.६० दलघमी एकट्या सोफिया प्रकल्पाला देण्यात आल्याने एकीकडे सिंचनाचा बोजवारा उडाला असताना...

परिणाम : अतिरिक्त पाण्यावर प्रश्नचिन्हअमरावती : जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पातील ८७.६० दलघमी एकट्या सोफिया प्रकल्पाला देण्यात आल्याने एकीकडे सिंचनाचा बोजवारा उडाला असताना पेयजलाचे भविष्यकालीन संकटही घोंगावते आहे. तूर्तास अप्पर वर्धा प्रकल्पात असलेला अल्प जलसाठा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पेयजलची समस्या आगामी काही वर्षांत भीषण रुप घेणार आहे.तद्वतच सोफियासारख्या औष्णिक विद्युत प्रकल्पाची तहानही ८७ दलघमीने भागणारी नाही. एकवेळ शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी प्रकल्पांपर्यंत नेण्याच्या बाताराजकीय नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या.तत्कालीन सरकारमधील काही बाशिंदे या प्रकल्पाच्या बाजूने असल्याने १५ लाख लोकसंख्येचे पेयजल आणि सिंचनाचे पाणी सोफियाला विकले गेले; तथापि सोफियाने तो करारनामासुद्धा मोडला. ऊर्ध्व वर्धा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासोबत केलेल्या कराराला न्यायालयात आव्हान दिले. शासनासोबतही दगाफटका केला, तर दुसरीकडे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या वार्षिक पाणी वापरात सोफियासाठी आरक्षित केलेल्या ८७ दलघमीच्या तुलनेत दीडपट पाणी आरक्षित तरी कुणासाठी? हे न उलगडणारे कोडे आहे. हे पाणी चोरले तर जात नाही ना, अशी शक्यता बळावली आहे. या सर्व गोरखधंद्याच्या पार्श्वभूमिवर औष्णिक प्रकल्पांकडून मागणी वाढल्यास त्याचा दुष्परिणाम पेयजल आणि सिंचनावर होणार आहे, हे सांगायला कुण्या तत्त्ववेत्त्याची गरज नाही. (प्रतिनिधी)पेयजल समस्या उद्भवणार!अमरावती : आज जरी अप्पर वर्धातून ११.४४ लाख लोकसंख्येस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी मोर्शी आणि वरूड तालुक्यातील पेयजल समस्या कायम आहे. उर्ध्व वर्धासाठी २४ गावांतील २५३८ कुटुंबांतील ११,८१७ नागरिक प्रकल्पबाधित झाली आहेत. या कुटुंबांना कायमचे विस्थापित जीवन वाट्याला आले असताना शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला गेल्यामुळे वीज निर्मितीसाठी लागणारा प्रचंड जलसाठा, सरासरी घटलेले पर्जन्यमान, पाचविला पुजलेला दुष्काळ, पर्यावरण नाश, आकुंचन पावलेल्या नद्या त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पेयजलाची मोठी समस्या उद्भवणार आहे. सार्वत्रिक तोटेच!सोफिया प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ५८ हजार एकर सिंचनाचे क्षेत्र बाधित झाले आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती सुरू झाल्यावर अमरावतीला वाजवी दरात वीज विकली जाईल, अशी घोषणा वारंवार झाल्या. मात्र प्रत्यक्षात वीज दराने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या प्रकल्पामुळे सिंचन क्षमता बाधित होण्याबरोबरच पेयजल समस्या, प्रदूषण, पर्यावरणाचा नाश, पीक उत्पादनात घट, आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत; तथापि या ज्वलंत समस्येवर आता कुठलाही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढायला तयार नाही. प्रदूषणाची घातकता, प्राणवायूच्या पातळीत घटऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रात दररोज हजारो टन कोळसा जाळल्या जातो. कोळशाच्या ज्वलंत प्रक्रियेत वातावरणातील आॅक्सिजन वापरला जातो. म्हणजेच एखाद्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राची क्षमता १ हजार मेगावॅट असल्यास त्या केंद्राची ऊर्जा निर्मिती क्षमता १० लाख युनिट प्रति तास राहील. या प्रक्रियेकरिता १० लक्ष किलो प्राणवायूही प्रतितास वापरण्यात येतो. त्यामुळे वातावरणातील प्राणवायूचा स्तर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पातून इतरही घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. राख आणि कोळशाचे कण आजूबाजूच्या परिसरात पसरतात. उपलब्ध ओझोन वायुचे विघटन होत असल्याने ते मानवी आरोग्य आणि पर्यावरणास घातक असताना औष्णिक विद्युत प्रकल्प निर्मितीसाठी पायघड्या अंथरल्या जातात. रात्रभरातून कायदे पण बदलविल्या जातात. (प्रतिनिधी)का लागते पाणी ?एक युनिट वीज निर्मिती करताना पाच लिटर पाण्याचा वापर प्रक्रियेत होतो. वीज निर्मिती करताना पाण्याची वाफ करून तिचा वापर प्रचंड दाबाखाली २००० अंश सेल्सिअसच्या वरील तापमानात करण्यात येतो. त्यामुळे कुलिंगा सिस्टिम अत्यंत प्रभावी ठेवाव्या लागतात. राख प्रवाहित करून राखेचा डोंगर तयार करण्यास पाण्याची गरज पडते. म्हणूनच १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुरेल, इतके पाणी सोफियासाठी आरक्षित करण्यात आले आहे. अतिरिक्त पाणी आरक्षण कुणासाठी ?विशेष म्हणजे औद्योगिक वापरासाठी २४.७३५ दश लक्ष घन मीटर पाणी आरक्षित असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून होत असला तरी औष्णिक वीज प्रकल्पांकरिता १२३.५२ दलघमी पाणी अतिरिक्त ठेवण्यात आले आहे. यात सोफियाकडून यंदा मागणी केलेल्या २४ दलघमी पाण्याचा अंतर्भाव असल्यास उर्वरित १२३.५२ दलघमी पाणी कुणासाठी अतिरिक्त, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे वस्तुनिष्ठ उत्तर जलसंपदा विभागाकडे उपलब्ध नाही, हे विशेष.