‘आय लव यू’ म्हणताच, मित्राला म्हणाला मी ५०० रुपयांची शर्यत जिंकलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:15 AM2021-04-23T04:15:07+5:302021-04-23T04:15:07+5:30

अमरावती : रस्त्याने जात असलेल्या अल्पवयीन मुलीला अडवून अल्पवयीन मुलाने थेट प्रपोज करीत ‘आय लव्ह यू’ म्हटले, घाबरून मुलगी ...

As soon as he said 'I love you', he told his friend that he had won the Rs.500 race | ‘आय लव यू’ म्हणताच, मित्राला म्हणाला मी ५०० रुपयांची शर्यत जिंकलो

‘आय लव यू’ म्हणताच, मित्राला म्हणाला मी ५०० रुपयांची शर्यत जिंकलो

googlenewsNext

अमरावती : रस्त्याने जात असलेल्या अल्पवयीन मुलीला अडवून अल्पवयीन मुलाने थेट प्रपोज करीत ‘आय लव्ह यू’ म्हटले, घाबरून मुलगी पुढे जाताच इतर दोन मित्राला मी ५०० रुपयांची बेट(शर्यत) जिंकला म्हणाला तसेच मुलीची छेडखानी केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील एका नगरात बुधवारी रात्री घडली.

याप्रकरणी पोलिसानी दोन अल्पवयीनांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. १४ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४(ड), ३४१, ३४ सहकलम १२ पोक्सो कायदानुसार गुन्हा नोंदविला. पोलीससूत्रानुसार, पीडित मुलगी मैत्रिणीसोबत मंदिरातून घरी जात असताना तीन मुले रस्त्यावर उभी होती. एका विधी संघर्षित बालकाने हात आडवा करून तिला अडविले. तसेच ‘आय लव यू’ म्हटले. मुलगी घाबरून पुढे गेली. मात्र, असे म्हणाल्याची इतर मित्रासोबत लावलेली ५०० रुपयांची पैज तो जिंकला व ते पैसे दे, असे म्हणाला. सदर मुले हे नेहमीच टवाळखोरी करून चिडीमारी करतात, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: As soon as he said 'I love you', he told his friend that he had won the Rs.500 race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.