शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जावई आला अन् कोरोना देऊन गेला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

सहा दिवस मुक्काम ठोकून सदर जावई ३१ मे रोजी त्यांच्या मूळगावी वानाडोंगरी येथे परत गेले. परंतु, तेथे अचानक प्रकृती खालावली. कोरोनाचे लक्षणे असल्याचा वैद्यकीय अंदाज आल्याने त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. ५ जून रोजी सकाळी त्यांचा थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वानाडोंगरी नगर परिषदेने जरूड येथील सरपंचांशी संपर्क साधून माहिती दिली.

ठळक मुद्देजरुडातील प्रकार : प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कजरूड : ‘मुंबईहून जावई आला आणि कोरोनाचा प्रसाद देऊन गेला’ असा प्रकार गुरुवारी येथे उघड झाला. यासंबंधाने येथील एकाच कुटुंबातील १९ व्यक्तींना बेनोडा येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. ६ जून रोजी त्यांचा थ्रोट स्वॅब घेतला जाणार आहे.नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील रहिवासी असलेले जरूडचे जावई पत्नी व मुलासह थेट मुंबईहून सासरी जरूडला २४ मे रोजी आले. सहा दिवसांनंतर ते आपल्या मूळगावी वानाडोंगरी येथे परतले. आता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सासरच्या किती लोकांना ते कोरोनाचा प्रसाद देऊन गेले, याचा शोध प्रशासन घेत आहे. या प्रकारामुळे पुन्हा वरूड तालुका क्वारंटाइन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर जावयाचा कोरोना चाचणी अहवाल नागपूर येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वैद्यकीय पथके जरुडात दाखल झाली आहेत.सहा दिवस मुक्काम ठोकून सदर जावई ३१ मे रोजी त्यांच्या मूळगावी वानाडोंगरी येथे परत गेले. परंतु, तेथे अचानक प्रकृती खालावली. कोरोनाचे लक्षणे असल्याचा वैद्यकीय अंदाज आल्याने त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. ५ जून रोजी सकाळी त्यांचा थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वानाडोंगरी नगर परिषदेने जरूड येथील सरपंचांशी संपर्क साधून माहिती दिली. सरपंच सुधाकर मानकर यांनी तहसीलदार सुनील सावंत यांना माहिती दिली. यानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, नोडल अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी वैद्यकीय पथक जरूडला रवाना केले. सासरच्या मंडळीची तपासणी तसेच संपर्कात आलेल्या लोकांची यादी करणे सुरू असल्याचे प्रशासनाने 'लोकमत'ला सांगितले.जरू डमध्ये सहा दिवस राहून गेलेली व्यक्ती नागपूर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यांच्या संपर्कातील स्थानिकांना क्वारंटाईन करण्यात येईल. तथा एक आरोग्य तपासणी पथक जरूडला रवाना केले आहे.- अमोल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वरूड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या