जावई आला अन् कोरोना देऊन गेला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:01:12+5:30

सहा दिवस मुक्काम ठोकून सदर जावई ३१ मे रोजी त्यांच्या मूळगावी वानाडोंगरी येथे परत गेले. परंतु, तेथे अचानक प्रकृती खालावली. कोरोनाचे लक्षणे असल्याचा वैद्यकीय अंदाज आल्याने त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. ५ जून रोजी सकाळी त्यांचा थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वानाडोंगरी नगर परिषदेने जरूड येथील सरपंचांशी संपर्क साधून माहिती दिली.

The son-in-law came and gave it to Ankorona? | जावई आला अन् कोरोना देऊन गेला ?

जावई आला अन् कोरोना देऊन गेला ?

Next
ठळक मुद्देजरुडातील प्रकार : प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड : ‘मुंबईहून जावई आला आणि कोरोनाचा प्रसाद देऊन गेला’ असा प्रकार गुरुवारी येथे उघड झाला. यासंबंधाने येथील एकाच कुटुंबातील १९ व्यक्तींना बेनोडा येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. ६ जून रोजी त्यांचा थ्रोट स्वॅब घेतला जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील रहिवासी असलेले जरूडचे जावई पत्नी व मुलासह थेट मुंबईहून सासरी जरूडला २४ मे रोजी आले. सहा दिवसांनंतर ते आपल्या मूळगावी वानाडोंगरी येथे परतले. आता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सासरच्या किती लोकांना ते कोरोनाचा प्रसाद देऊन गेले, याचा शोध प्रशासन घेत आहे. या प्रकारामुळे पुन्हा वरूड तालुका क्वारंटाइन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर जावयाचा कोरोना चाचणी अहवाल नागपूर येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वैद्यकीय पथके जरुडात दाखल झाली आहेत.
सहा दिवस मुक्काम ठोकून सदर जावई ३१ मे रोजी त्यांच्या मूळगावी वानाडोंगरी येथे परत गेले. परंतु, तेथे अचानक प्रकृती खालावली. कोरोनाचे लक्षणे असल्याचा वैद्यकीय अंदाज आल्याने त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. ५ जून रोजी सकाळी त्यांचा थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वानाडोंगरी नगर परिषदेने जरूड येथील सरपंचांशी संपर्क साधून माहिती दिली. सरपंच सुधाकर मानकर यांनी तहसीलदार सुनील सावंत यांना माहिती दिली. यानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, नोडल अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी वैद्यकीय पथक जरूडला रवाना केले. सासरच्या मंडळीची तपासणी तसेच संपर्कात आलेल्या लोकांची यादी करणे सुरू असल्याचे प्रशासनाने 'लोकमत'ला सांगितले.

जरू डमध्ये सहा दिवस राहून गेलेली व्यक्ती नागपूर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यांच्या संपर्कातील स्थानिकांना क्वारंटाईन करण्यात येईल. तथा एक आरोग्य तपासणी पथक जरूडला रवाना केले आहे.
- अमोल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वरूड

Web Title: The son-in-law came and gave it to Ankorona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.