शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या दफनविधीसाठी त्यानं घराच्या अंगणातच खणला खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 20:26 IST

वृद्ध महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

धामणगाव रेल्वे (अमरावती) : वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर दफनविधीसाठी घरातील अंगणातच खड्डा खणल्याचा प्रकार पोलीस पाटलांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला. ही घटना तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे घडली.त्रिवेणीबाई वायलोजी पाटील (७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मानसिकरित्या खचलेल्या तिच्या मुलाने (गिरीधर पाटील, वय ४५ वर्षे) पार्थिवासाठी अंगणात खड्डा खणला. पतीचे निधन व मोठ्या मुलीच्या विवाहानंतर वृद्ध त्रिवेणीबाई आणि मुलगा गिरीधर हे दोघेच घरात राहत होते. गिरीधर यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला. मात्र त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. शुक्रवारी नजीकच्या धनोडी गावाहून गिरीधर घरी परतला. शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान तो अंगणात खड्डा खणताना शेजाऱ्यांना दिसला. मात्र, दररोज काम करणाऱ्या वृद्ध त्रिवेणीबाई दिसल्या नाहीत. ही बाब शेजाऱ्यांनी पोलीस पाटील मनीष राजूरकर यांना कळवली. त्यांनी तळेगाव दशासर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, गिरीधरची आई त्रिवेणीबाई यांचा मृतदेह घरात चटईवर आढळून आला. तर अंगणात २ बाय ३ फुटाचा खड्डा खणल्याचे दिसले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्रिवेणीबाईंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे तळेगाव दशासर पोलिसांनी सांगितले. चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात त्रिवेणीबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्रिवेणीबाई यांचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा प्राथमिक अंदाज तळेगाव दशासर पोलिसांनी वर्तवला आहे. मुलगा गिरीधर हा गतिमंद असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू