शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’चे संकेतस्थळ बंद, महिनाभरापासून कामकाज ठप्प

By गणेश वासनिक | Updated: February 28, 2023 17:57 IST

पुणे येथील एजन्सीकडे कंत्राट, ऑफलाइन कामकाजाला ब्रेक

अमरावती : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे संकेतस्थळ गत महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, मराठा, एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी भटकंती करावी लागत आहे. चांद्यापासून तर बांध्यापर्यंत हीच स्थिती असताना राज्य सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविल्याचे वास्तव आहे.

‘कास्ट व्हॅलिडिटी’संबंधित अर्ज स्वीकारणे, पोचपावती देणे, त्रुटीची पूर्तता करणे, जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाइन देणे ही कामे पुणे येथील एका एजन्सीकडे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने साेपविली आहे. विद्यार्थी, नागरिक वा राजकीय व्यक्तींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळविणे सुकर व्हावे, यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्यभरात महिनाभरापासून ‘कास्ट व्हॅलिडिटी’चे संकेतस्थळ बंद असताना पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘कास्ट व्हॅलिडिटी’बाबतचा ऑनलाइन कामांचा कंत्राट सोपविताना अटी, शर्थीच्या अधीन राहून करारनामा झाला आहे. तब्बल महिनाभरापासून सदर एजन्सीने पोर्टल बंद ठेवले असेल तर ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. तर दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ विभागात उमेदवार आणि पालक येरझारा मारून थकून गेले आहेत. ऑनलाइन कामकाज बंद असताना ऑफलाइनची सुविधा नाही, हे विशेष.

- तर फौजदारी दाखल करण्याची तरतूद

‘कास्ट व्हॅलिडिटी’ऑनलाईन कामकाजाविषयीचे संकेतस्थळ पूर्वसूचना न देता बंद केले असेल तर करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदार एजन्सीवर फौजदारी दाखल करण्याची तरतूद आहे. राज्यभरात संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले असताना याकडे पुणे येथील प्रमुखांनी का बरं दुर्लक्ष चालविले, हा देखील चिंतेचा विषय आहे. कंत्राटदार एजन्सीने तब्बल महिन्याभरापासून पोर्टल बंद ठेवल्याप्रकरणी फौजदारी दाखल करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.‘बार्टी’ संचालकांचा ‘नो रिपॉन्स’

हल्ली दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. काही दिवसांनंतर विद्यार्थ्यांची ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी गर्दी उसळणार आहे. अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, मराठा, एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांची ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी होणारी फरफट थांबावी, यासाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संचालक धम्मज्योती गजभिये यांच्याशी ‘लाेकमत’ने सतत संपर्क साधला असता उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकारAmravatiअमरावती