शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

‘तारादूत’करणार सामाजिक जाणीव-जागृती; ‘सारथी’चा पथदर्शी प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 20:46 IST

‘सारथी’ने आठ विभागांसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे

अमरावती : छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे (सारथी) द्वारे सामाजिक जाणीव-जागृती उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता ‘तारादूत’ म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘महिला सक्षमीकरण’, ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयांच्या शहर, गाव-खेड्यांत जाणीव-जागृतीवर भर असणार आहे.

‘सारथी’ने आठ विभागांसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तारादूत’ म्हणून नियुक्त होणारे स्वंयसेवक हे पदवीधर असणे अनिवार्य आहे. सामाजिक जाणीव, थोर-महापुरूषांच्या विचारांची माहिती, ज्ञान असलेल्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषत: स्त्री-पुरुष समानतेची जाणीव समाजात रुजावी, यासाठी पथदर्शी प्रकल्पांची दोन वर्षांसाठी पायाभरणी केली जाते आहे. ‘तारादूत’साठी सारथीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना १९ आॅगस्टपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवाराचे वय ३१ आॅगस्ट रोजी ४६ वर्षांपेक्षा जास्त असू नये, अशी नियमावली आहे.

दोन वर्षांकरिता ११ महिन्यांच्या करारावर ही नियुक्ती केली जाणार असून, दरमहा १८ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. विभागानिहाय उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्यानंतर ‘तारादूत’ म्हणून नियुक्ती दिली जाईल. त्यानंतर उमेदवारांचे महिनाभराचे निवासी प्रशिक्षण आणि थेट प्रकल्पाच्या कर्तव्यावर नियुक्ती केली जाणार आहे. राज्यात १४४० ‘तारादूत’ निवडले जाणार आहेत.

अशी भरली जातील आरक्षणानुसार पदे अनुसूचित जाती - १८८, अनुसूचित जमाती - १०१, वि.जा. अ - ४३, भ.ज. ब -३६, भ.ज. क - ५२, भ.ज. ड - २८, वि.मा.प्र. - २८, ओबीसी - २७४, ईसीबीसी - १८८, आर्थिक दुर्बल घटक - १४२, खुला- ३६०———-विभागनिहाय भरतीची आकडेवारीपुणे - १६०कोल्हापूर - २००लातूर - १५६औरंगाबाद - १५२नाशिक - १६०मुंबई - १३६अमरावती - २२४नागपूर - २५२

‘तारादूत’हा सामाजिक जाणीव-जागृतीसाठी शासनाचा अंग असणार आहे. ‘सारथी’कडे विशेषत्वाने जबाबदारी दिली आहे. दोन वर्षांत हा पथदर्शी प्रकल्प समाजापर्यंत पोहोचून काम करेल.    - डी.आर. परिहार,   प्रबंध संचालक, सारथी.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र