शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

-अन् बसच्या स्टेअरिंगवर येऊन बसला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 11:08 IST

नागपूरहून नांदगाव पेठकडे येणाऱ्या बसचालकाने रस्त्यावरील एका सापाला वाचविले अन् बस पुढे नेली, मात्र, काही अंतराच्या प्रवासानंतर तोच साप अचानक बसच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचल्याचे पाहून चालकांची भंबेरीच उडाली.

ठळक मुद्देचालकांची उडाली भंबेरी नांदगाव पेठ स्थानकावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूरहून नांदगाव पेठकडे येणाऱ्या बसचालकाने रस्त्यावरील एका सापाला वाचविले अन् बस पुढे नेली, मात्र, काही अंतराच्या प्रवासानंतर तोच साप अचानक बसच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचल्याचे पाहून चालकांची भंबेरीच उडाली. रविवारी हा प्रकार नांदगाव पेठ बसस्थानकावर उघड होताच सर्पमित्रांच्या मदतीने सापाला पकडण्यात आले.नागपूरहून बसप्रवाशांना घेऊन एक एसटी क्रमांक एमएच २७-५७०३ ही अमरावतीकडे येत होती. बस नांदगाव पेठ बसस्थानकावर पोहोचली. तेव्हा साप रस्ता ओलांडत होता. त्यामुळे बसचालक चेतन ढाकुलकर (चांदुररेल्वे) यांनी सापाला वाचवून आपला पुढील प्रवास सुरू ठेवला. मात्र, दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास मोझरीवरून बस नांदगाव पेठ स्थानकावर पोहोचणार तेच बस चालकाची नजर स्टेअरींगजवळ गेली आणि त्यांची भंबेरीच उडाली. स्टेअरिंगजवळ पोपटी रंगाचा साप पाहून चालकांची बोलतीच बंद झाली. मात्र, एसटीतील प्रवाशांचा विचार करून त्यांनी स्टेअरिंंगवर ताबा घेऊन कशीबशी एसटी नांदगाव पेठ स्थानकात नेली. साप असल्याच्या माहितीवरून बसप्रवाशांची तारांबळ उडाली. प्रशासनाकडून या प्रकाराची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र अभिजित दाणी यांनी ती माहिती त्यांचे सहकारी रक्षक वन्यजीव सरंक्षण संस्थेचे ठकसेन इंगोले व अक्षय चंबतकर यांना दिली. त्याच्या माहितीवरून सर्पमित्र जय पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला जिवंत पकडले. त्यावेळी बस चालकास व प्रवाशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्पमित्रांनी सापाचे निरीक्षण केले असता, तो दुर्मिळ हरणटोळ प्रजातीचा साप असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :snakeसाप