अमरावती : राज्य शासनाला ‘स्मार्ट सिटी’त १० शहरांचा समावेश करून ही शहरे विकसित करायची आहेत. यात अमरावतीचा समावेश व्हावा, यासाठी महापालिका आयुक्तांचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत पायाभूत सुविधांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील १०० शहरांना ‘स्मार्ट सिटी’ करायचे आहे. यात ठाणे जिल्ह्यातील एका गावाचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील १० शहरे ‘स्मार्ट’ करायची आहेत. या अनुषंगाने नगरविकास खात्याने बोलाविलेल्या बैठकीत राज्यातील महापालिका आयुक्त उपस्थित होते.
‘स्मार्ट सिटी’कडे आणखी एक पाऊ ल
By admin | Updated: March 23, 2015 00:16 IST