शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोलंबोत भारत श्रीलंका मैत्री जिंदाबादचे नारे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 20:54 IST

कोलंबोत पार पडलेल्या योग संमेलनात भारत व श्रीलंकेच्या मैत्री जिंदाबादचे नारे गुंजले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने श्रीलंका सरकारच्या क्रीडा खात्याच्या सहकार्याने पहिल्यांदाच योग संमेलन व योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

अमरावती : कोंलबोत पार पडलेल्या योग संमेलनात भारत व श्रीलंकेच्या मैत्री जिंदाबादचे नारे गुंजले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने श्रीलंका सरकारच्या क्रीडा खात्याच्या सहकार्याने पहिल्यांदाच योग संमेलन व योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संमेलन समितीचे अध्यक्ष प्राचार्य अरुण खोडस्कर व सचिव रवि शाहू यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून दिली. ११ फेबु्रवारी रोजी संमेलनाच्या उद्घाटन श्रीलंकेच्या क्रीडा खात्याचे मंत्री हरिन फरनांडो यांच्या मार्गदर्शनात सचिव चुलांनादा परेसा यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचे माजी सहसंचालक योगतज्ज्ञ मुकुंद भोळे, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाचे सचिव निहाल हननायके, राष्ट्रीय क्रीडा विज्ञान संस्थेचे संचालक साजिद जयलाल, भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका राजेश्री बेहरा, जागतिक आरोग्य संघटनेच्या कोलंबो शाखेच्या संचालिका रजिया पेंडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. संमेलनात योग कार्यशाळा, योगासन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती पत्रपरिषदेतून देण्यात आली. यावेळी हव्याप्र मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, सुरेश देशपांडे, कमलकाम देवनाथ, स्मिता आदी उपस्थित होते.

टॅग्स :IndiaभारतSri Lankaश्रीलंका