शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेपायी नवजात बालिकेचे सहावे बोट ब्लेडने छाटले; मेळघाटातील भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:22 IST

आदिवासी समाजात २१ बोटांची मुलगी घराण्याला बाधक ठरत असल्याची अंधश्रद्धा येथील आदिवासींमध्ये रुळली आहे. अशा मुलींना लग्नावेळी वरपक्षाकडून हीन वागणूक मिळण्याची भीती व्यक्त केली जाते.

ठळक मुद्देचुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारटेंब्रू येथील घटना

मारोती पाटणकर/लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या उजव्या हाताचे सहावे बोट ब्लेडने हड्डीसह छाटल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्यातील टेंब्रू येथे उघडकीस आला. या अघोरी कार्यामुळे त्या बाळाच्या हातात पस जमा झाल्याने अखेर तिला चुरणी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी भरती करण्यात आले.आदिवासी समाजात मुलींच्या हातापायाला २१ बोटे असणे अपशकून मानले जाते. अशा मुलींना लग्नावेळी वरपक्षाकडून हीन वागणूक मिळण्याची भीती व्यक्त केली जाते. २१ बोटांची मुलगी घराण्याला बाधक ठरत असल्याची अंधश्रद्धा येथील आदिवासींमध्ये रुळली आहे. त्या अंधश्रद्धेतून त्या नवजात अर्भकाचे सहावे बोट छाटून टाकले.टेंब्रु गावात १० सप्टेंबर रोजी विमल मोंग्या तांडीलकर (२५) या मातेने जुळ्यांना जन्म दिला. प्रसूतीसाठी गावातील दाई जासमू छोटेलाल कास्देकर हिला बोलावण्यात आले होते. दोन्ही बाळांची प्रसूती सामान्य स्थितीत झाली. त्यांची प्रकृतीदेखील चांगली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील गोणाय सावजी कास्देकर या महिलेने बाळांची पाहणी केली असता स्त्री जातीच्या बाळाच्या उजव्या हाताला सहा बोटे दिसून आली. गोणायने अंधश्रद्धेपोटी बाळाच्या उजव्या हाताचे सहावे बोट ब्लेडने हाडासह छाटून टाकले. बाळाने आकांत केला. त्या जखमेवर जडीबुटी लावून तात्पुरता उपचार करण्यात आला.मुलगी आकांत करत असतानाही प्रसूता दवाखान्यात जाण्यास उत्सुक नव्हती. चौथ्या दिवशी बाळाच्या हातात पस झाला. त्याची प्रकृती खालावू लागली. दायीच्या सल्ल्यानुसार काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले व उपचार करण्यात आले. पुढे १०८ अ‍ॅम्ब्यूलन्सने तिला चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.आदिवासी समाजात ११ बोटांच्या बाळांबाबत अंधश्रद्धा असल्याचे दायीचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी गावातीलच एका अशिक्षित बाईने ते सहावे बोट कापल्याची माहिती मिळाली.आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ

टॅग्स :SocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी