लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : एकुलत्या एक मुलास जंगलात गळा आवळल्यानंतर नाल्यातील पाण्यात बुडवून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील मोझरी येथे सोमवारी उघडकीस आली. घटनेतील क्रूरकर्मा पित्यास पोलिसांनी अटक केली. त्याने कुठल्या कारणावरून हत्या केली, याचा तपास पोलिसांनी चालविला आहे.रामदास हिरालाल शेलूकर (३५, रा. मोझरी) असे पित्याचे, तर धर्मा (६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. आरोपी रामदासला तीन मुली, मुलगा, पत्नी आई-वडील असा परिवार आहे. ते सर्व एकाच घरात राहत होते. रामदासने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास मुलगा धर्माला गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चंद्रभागा नदीजवळील इसाफाटा नाल्यात नेले. तेथे गळा आवळून नाल्याच्या पाण्यात बुडवून हत्या केली.रामदासचे वडील हिरालाल सेलूकर यांनी चिखलदरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. रविवारी रात्री परतलेल्या रामदासला सोमवारी सकाळीच ठाणेदार आकाश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विनायक लंबे, शहाजी रूपनर, सहायक उपनिरीक्षक सुरेश राठोड, जमादार ईश्वर जांबेकर, अविनाश देशमुख, प्रभाकर चव्हाण, पोलीस नाईक विनोद इसळ, खुपिया नीलेश काळे, आशिष वरघट आदींनी घरून अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१ (हत्या, पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल केला.गावकऱ्यांनी ठेवले बांधूनरविवारी सकाळी जंगलात गेलेल्या रामदासने सहा वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह मातीत दाबून ठेवला. सायंकाळी घरी परतला असता, पत्नी व कुटुंबातील सदस्यांनी त्याला मुलाबद्दल विचारले असता, आधी त्याने काहीच उत्तर दिले नाही, त्यानंतर मुलाची हत्या करून मृतदेह जंगलात गाडल्याचा धक्कादायक खुलासा केला. सर्वांच्या पाया खालची वाळू सरकली. त्याला बांधून ठेवण्यात आले.कारण गुलदस्त्यातआरोपीने पोटच्या गोळ्याची निर्दयतेने हत्या कशासाठी केली, याचा तपास पोलीस करणार आहेत. मात्र, अद्याप प्रथमदर्शी आरोपीने कुठलीही कबुली वा खुलासा केला नाही. तो कामधंदा न करता आई-वडील आणि पत्नीच्या मोलमजुरीवर जगत होता. मनात आले तेव्हा तो कुठेही निघून जात असल्याची माहिती पुढे आली आहे.सहा वर्षीय चिमुकल्याची हत्या करून मृतदेह लपवून ठेवल्याच्या कारणावरून आरोपी वडिलाला अटक करण्यात आली. तपास सुरू आहे.- आकाश शिंदेठाणेदार, चिखलदरा
सहा वर्षीय मुलाची पाण्यात बुडवून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST
रामदास हिरालाल शेलूकर (३५, रा. मोझरी) असे पित्याचे, तर धर्मा (६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. आरोपी रामदासला तीन मुली, मुलगा, पत्नी आई-वडील असा परिवार आहे. ते सर्व एकाच घरात राहत होते. रामदासने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास मुलगा धर्माला गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चंद्रभागा नदीजवळील इसाफाटा नाल्यात नेले. तेथे गळा आवळून नाल्याच्या पाण्यात बुडवून हत्या केली.
सहा वर्षीय मुलाची पाण्यात बुडवून हत्या
ठळक मुद्देपित्याचे कृत्य : मृतदेह ठेवला खड्ड्यात गाडून; घरातून केली अटक