शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नगराध्यक्षाच्या पतीसह सहा जणांना अटक

By admin | Updated: May 25, 2017 00:03 IST

अचलपूर नगरपालिका पोटनिवडणुकीच्या मुद्यावरून मंगळवारी मध्यरात्री २ वाजता दोन गटात राडा झाला.

नगरपरिषद पोटनिवडणूक : अचलपुरात दोन गटांत राडालोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिका पोटनिवडणुकीच्या मुद्यावरून मंगळवारी मध्यरात्री २ वाजता दोन गटात राडा झाला. याप्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांचे पती नगरसेवक नरेंद्र फिस्के यांच्यासह सहा जणांना सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याच्या गुह्याखाली अटक केली. बुधवारी सांयकाळी सहा वाजता या सहाही जणांना जामीन देण्यात आला. अचलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.बी.ब्राह्मणे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. नगरसेवक फिस्के यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख किशोर कासार, मिलिंद बेलसरे तर गौर गटातील रामस्वरूप गौर, संतोष गौर, भूषण पानीवाले यांना अटक करण्यात आली. विस्तृत माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १९ ब सर्वसाधारण महिला गटाकरिता बुधवार २४ मे रोजी पोटनिवडणूक होती.शहराला पोलीस छावणीचे स्वरूप परतवाडा : निवडणूक प्रचाराच्या मुद्यावरून मंगळवारी रात्री दहा वाजता दोन गट समोरासमोर आले. वाद वाढला आणि तणाव निर्माण झाला. अपक्ष उमेदवार लता गौर आणि सेनेच्या सारिका पिंपळे यांच्या प्रचारावरून हा वाद उफाळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. थोड्यावेळाने दोन्ही गटात समझोता झाला. पोलिसांत तक्रार न देण्याचे ठरले. मात्र, तरीही बुधवारी मतदानादरम्यान पुन्हा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्रीच सहा जणांना स्थानबद्ध केले होते. मात्र, बुधवारी सायंकाळी त्यांना पोलीस ठाण्यातून जामीन देण्यात आला. सहापैकी चौघांचे मतदान असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर नेण्यात आले. प्रभाग क्रमांक १९ ब येथील नगरसेवकाच्या रिक्त जागेकरिता बुधवारी पोटनिवडणूक झाली. शिवसेनेच्या सारिका अनिल पिंपळे, भाजपच्या सारिका धर्मा राऊत, अपक्ष लता रामभरोसे गौर व दोन इतर असे पाच उमेदवार येथून रिंगणात होते. २३ मे दोन गटात उद्भवलेला वाद पाहता शहरात पोलिसांचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात आला होता. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार निर्भय जैन, नायब तहसीलदार राजेंद्र काळे, ठाणेदार भानुप्रताप मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मीणा यांनी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तर राखीव पोलिस दलाने परिस्थितीवर नियंत्रणात ठेवली. ६९.२४ टक्के मतदानप्रभाग क्रमांक १९ ब सर्वसाधारण महिला गटाकरिता बुधवारी झालेल्या पोटनिवडणुकित चार मतदान केंद्रांवर एकूण ६९.२४ टक्के मतदान झाले. त्यामध्ये २३५६ पुरूष तर १८१० महिलांनी मतदान केले. २६ मे रोजी याप्रभागाची मतगणना होणार आहे. पीएसआय ब्राह्मणे यांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांना अटक करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली.- भानूप्रताप मडावी ठाणेदार, अचलपूर आमचे कुठल्याही प्रकारचे भांडण झाले नाही. नेहमीप्रमाणे बाजारातून काम आटोपून घरी आलो होतो, पोलिसांनी उचलून नेले.- रामस्वरूप गौर उमेदवाराचा नातलग