शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांच्या बालिकेचा कोरोना संसर्गाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

 चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील ती सहा महिन्यांची चिमुकली आहे. आजारी असल्याने तिच्या पालकांनी चांदूर रेल्वे येथील डॉक्टरकडे उपचारार्थ नेले. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्यांनुसार अमरावती येतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले व या चिमुकलीला मेंदूज्वरासोबत कोरोना पॉझिटिव्हचे निदान करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालिकेला सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले.

ठळक मुद्देपहिलीच घटना, चिमुकल्यांना होतोय कोरोनाचा डंख, पालकांनी काळजी घेणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गाचे भयंकर रूप आता बाहेर येत आहे. चिमुकल्यांना होणारा कोरोनाचा डंख जीवघेणा ठरत असल्याचे मंगळवारच्या घटनेवरून समोर आले. सहा महिन्यांच्या चिमुकलीचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील ही पहिलीच घटना असल्याची शक्यता आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील ती सहा महिन्यांची चिमुकली आहे. आजारी असल्याने तिच्या पालकांनी चांदूर रेल्वे येथील डॉक्टरकडे उपचारार्थ नेले. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्यांनुसार अमरावती येतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले व या चिमुकलीला मेंदूज्वरासोबत कोरोना पॉझिटिव्हचे निदान करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालिकेला सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. येथे तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मात्र, या ठिकाणी पेडियाट्रिक डॉक्टर व आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे चिमुकलीला डॉ. सोहेल बारी यांच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ  दाखल करण्यात आले.  तेथे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच झटके देखील येत होते, असे डॉक्टर बारी यांनी सांगितले. २४ तासांच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे बारी म्हणाले. दरम्यान मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात चिमुकलीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकलीच्या माता-पित्याला कोरोनाचा संसर्ग नव्हता. मात्र तिला मेंदूज्वर असल्याने उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये असताना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. तिचा मृत्यू हा मेंदूज्वरानेच झाला असू शकतो. ती संक्रमित असल्याने मंगळवारच्या मृत कोरोनाग्रस्तांच्या यादीमध्ये तिच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला. प्राथमिक दृष्ट्या असे निदर्शनात आले. अंतिम यादीत कोरोना ऐवजी मेंदूज्वराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट होईल.

या चिमुकलीला मेंदूज्वर होता, तिला वारंवार झटके येत होते. यासोबतच कोरोनाचा संसर्गदेखील होता. आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ एक दिवसच होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. - डॉ सोहेल बारी,बेस्ट हॉस्पिटल

या चिमुलीला सुपर स्पेशालिटीमधून येथे पाठविण्यात आले होते. तिला मेंदूज्वर होता व ती खूप वीक होती. त्यात कोरोनाचा संसर्गही होता. या दोन्ही आजारांनी तिचा मृत्यू झाला. - अद्वैत पानट, बालरोगतज्ञ

चिमुकलीच्या मेंदूवर सूजतपासणीसाठी चिमुकलीच्या पाठीच्या कण्यातील पाणी (सीएसएफ) काढण्यात आले. त्यामध्ये प्रोटिन्स खुप वाढले होते. म्हणजेच मेंदूवर सूज होती. ही लक्षणे कोरोनामध्ये कमी दिसून येत असल्याचे डॉ. पानट म्हणाले.

चिमुकल्यांमध्ये आढळतात ही लक्षणेबालरोगतज्ज्ञ अद्वैय पानट यांच्या माहितीनुसार, चिमुकल्यांना प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, पातळ संडास आदी कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत. ही बालके काही सांगू शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किंबहुना या एका महिन्याच्या काळात बालकांना घराबाहेर काढूच नये, त्यांना जवळ घ्यायचे झाल्यास पहिले हात सॅनिटाईज करून घ्यावे व घरातील वृद्ध आजी-आजोबा यांच्याजवळ बालकांना देऊन नका. या बालकांमुळे त्यांना संसर्ग झाल्याची उदाहरणे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू