शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Amravati | परतवाडा-बैतूल मार्गावर कारची दुचाकीला जबर धडक; सहा ठार, एक गंभीर

By प्रदीप भाकरे | Updated: July 18, 2022 11:03 IST

पोलिसांनी रस्त्यात पडलेल्या सीट कव्हरवरून शोध घेतला असता ही घटना उघड झाली.

अमरावती :  परतवाडा ते बैतुल मार्गावर निंभोरा फाटा येथे दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी नाल्यात कोसळली. रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन्ही वाहनातील एकूण सहा जण ठार झाले. पोलिसांनी रस्त्यात पडलेल्या सीट कव्हरवरून शोध घेतला असता ही घटना उघड झाली.

पोलीस सूत्रानुसार, शिरसगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरा फाटा येथे 17 जुलै रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांची चमू गस्तीदरम्यान पोहोचली. त्यांना सीट कव्हर रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसले. यामुळे शंका येऊन पोलिसांनी पाहणी केली असता दुचाकी व कार नाल्यात निदर्शनास आली.

बहिरम मार्गावरील एका हार्डवेअर प्रतिष्ठान येथून चालकासह पाच जण एका चारचाकीने  रात्री दुकान बंद करून निघाले होते. पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायचे होते. निंभोरा फाट्याजवळ पोहोचतात त्यांच्या चारचाकीने प्रतीक दिनेश मांडवकर (26) यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे चार चाकी अनियंत्रित होऊन नजीकच्या पुलावरून नाल्यात कोसळली. यात संजय गजानन गायन (22, रा बोदड) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी उपचारार्थ दाखल केले आहे. तर अपघातात पांडुरंग रघुनाथ शनवारे (30, रा बोदड ता चांदूर बाजार),सतीश सुखदेव शनवारे (30, रा बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (25, रा. खरपी). चारचाकीचा चालक रमेश धुर्वे (30 रा सालेपूर), दुचाकीचालक प्रतीक दिनेश मांडवकर (26),अक्षय सुभाष देशकर (26, रा बोदड ता चांदूर बाजार) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

चारचाकीमालक आणि हार्डवेअरचा संचालक राजू चुन्नीलाल मानधने (52, रा. परतवाडा) यांनी या घटनेची फिर्याद शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत गीते यांच्या मार्गदर्शनात होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावतीDeathमृत्यू