लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/चिखलदरा : स्वत:च्या खात्यातील पैसे काढण्यासाठी सहा ते आठ तास बँकेच्या पुढे रांगेत लागून हजार, दोन हजार रुपये मिळत असल्याचे वास्तव सोमवारी खासदार नवनीत राणा यांनी चुरणी येथे अनुभवले. रांगेतील वयोवृद्धांची चौकशी करताच त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी तात्काळ नागपूर, मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरीत बँकेतील भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केलाखासदार नवनीत राणा यांचा चुरणी येथे सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गावात येताच त्यांना अलाहाबाद बँकेसमोर शंभर ते दीडशे आदिवासींची रांग दिसली. हा सर्व प्रकार पाहून खासदारांनी तात्काळ संबंधित शाखा व्यवस्थापकाला विचारणा केली. परिसरातील २५ खेड्यांतील ३० हजारांपेक्षा अधिक ग्राहक या बँकेशी जुळले आहेत, तर शिपायासह केवळ तीन कर्मचारी आहेत. दुसरीकडे आठवड्यातून एकदाच रोकड येते, असे सांगण्यात आले. खासदारांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत खडसावले. या खेड्यात बस येत नसल्याने अतिदुर्गम परिसरातील आदिवासी मिळेल त्या वाहनाने वा १५ ते २० किलोमीटर अंतर कापून पैसे काढण्यासाठी रांगेत लागतात, हे विशेष.खासदारांच्या जनता दरबाराला अधिकाऱ्यांची दांडीचुरणी (चिखलदरा) : येथील जनता दरबाराला अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे खासदार नवनीत राणा संतप्त झाल्या. नेमके कुठल्या विभागाचे अधिकारी अनुपस्थित आहेत, याचा आढावा घेत खासदारांनी त्यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश दिले. यादरम्यान जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे यांच्याबाबत तक्रारींचा सूर अधिक तीव्र होता. खा. राणा यांनी भरगच्च जनता दरबारात आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या. काही समस्या ‘ऑन द स्पॉट’ सोडविण्यात आल्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओंशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन खासदारांनी दिले. यावेळी आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार माया माने, शहाजी रूपनर, काटकुंभ चौकीतील पोलीस कर्मचारी सुरेश राठोड, पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे, रामकली राजू भुसुम, सुमीता दारसिंबे, मिश्रीलाल झारखंडे, पीयूष मालवीय, सुखदेव आंबेडकर, विनोद हरसुले आदी उपस्थित होते.दोन तासांत मिळाला कर्मचारीखासदार नवनीत राणा यांनी अलाहाबाद बँकेचा कारभार व मेळघाटातील समस्या लोकसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या अधिकाऱ्यांनी दोन तासांत एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती चुरणी येथील शाखेत केल्याचे टपाली उत्तर दिले.मेळघाटात अनेक समस्या आहेत. त्या केंद्रीय मंत्र्यांना सांगेन. लोकसभा अधिवेशनात हे सर्व मुद्दे मांडणार आहोत.- नवनीत राणाखासदार, अमरावती
सहा तास रांगेत लागून मिळतात केवळ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:01 IST
खासदार नवनीत राणा यांचा चुरणी येथे सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गावात येताच त्यांना अलाहाबाद बँकेसमोर शंभर ते दीडशे आदिवासींची रांग दिसली. हा सर्व प्रकार पाहून खासदारांनी तात्काळ संबंधित शाखा व्यवस्थापकाला विचारणा केली. परिसरातील २५ खेड्यांतील ३० हजारांपेक्षा अधिक ग्राहक या बँकेशी जुळले आहेत, तर शिपायासह केवळ तीन कर्मचारी आहेत. दुसरीकडे आठवड्यातून एकदाच रोकड येते, असे सांगण्यात आले.
सहा तास रांगेत लागून मिळतात केवळ हजार रुपये
ठळक मुद्दे२० किमीवरून येतात आदिवासी : खासदार संतापल्या, दोन तासांत कर्मचारी नियुक्त