शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शिवशाहीत गुदमरतो जीव, लालपरीला ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:35 IST

प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाहीत जीव गुदमरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उलट्या आणि डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे लाल बसची अवस्था पाहूनच प्रवासी नकार देतात. परतवाडा आगारात भंगार बसची संख्या वाढली आहे

ठळक मुद्देभंगार बसची संख्या वाढली : प्रवाशांचे नियोजन कोलमडले, महामंडळ ढिम्म

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाहीत जीव गुदमरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उलट्या आणि डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे लाल बसची अवस्था पाहूनच प्रवासी नकार देतात. परतवाडा आगारात भंगार बसची संख्या वाढली आहे. त्यांच्या वेळेचे नियोजन नाही. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.परतवाडा आगारातील चार शिवशाही बसपैकी दोन बसमध्ये वातानुकूलन यंत्रणा योग्य काम करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. बसमधील वातावरण थंड होत नाही. या हवाबंद बसमध्ये प्राणवायूची कमतरता जाणवते. बसमध्ये खिडक्या उघडण्याची तरतूद नाही. त्यातच बस पीकअप घेत नाही म्हणून एसी कमी ठेवण्याचे, बंद करण्याचे प्रकारही घडत आहेत.परतवाडा आगारातून अमरावती, अकोला, धारणी, भुसावळ, चिखलदरा, नागपूरसह विदर्भात व विदर्भाबाहेर दररोज हजारो प्रवासी घेऊन फेरी करणाऱ्या एसटी बस ऊर्फ लालपरीची स्थिती दयनीय बनली आहे. काहींच्या खिडक्या व काच गायब आहेत. इंजिनची स्थिती अत्यंत वाईट आहे. अगदी भंगार स्थितीतील गाड्या डेपोतून पाठवल्या जात आहेत. परतवाडा-अमरावती मार्गावर दिवसाआड एक ते दोन बस रस्त्यात कुठे ना कुठे फेल पडत आहे. देखभाल व दुरूस्तीचे परिणामकारक नियोजन नसल्याने नादुरुस्त बसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तासन्तास प्रतीक्षापरतवाडा डेपोच्या व तेथून सुटणाºया अनेक बसची वेळ पाळली जात नाही. बस, प्रवासी आणि वेळ यांचा ताळमेळ, नियोजन नाही. एक तर एकामागोमाग बस एकाच वेळेस सुटतात. त्यामुळे कित्येक बसेस रिकाम्या जातात. या बस निघून गेल्यानंतर प्रवाशांना बसची तासन्तास वाट बघावी लागत आहे.प्रवासी पळवले जातातरिकाम्या बस डेपोबाहेर रस्त्यावर काढल्यानंतर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना खासगी वाहतूकदार स्वत:कडे आकर्षित करतात. याकरिता आपले वाहन अगदी बस स्थानकासमोर उभ्या राहील, अशी तजवीज करतात. एजन्टांना बस स्थानकात पाठवून या प्रवाशांना आणले जाते. एजन्ट अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत एसटी महामंडळाचे प्रवासी पळवून नेत असले तरी बस स्थानकातील कुणीही अधिकारी त्यांना आळा घालण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती बघायला मिळत आहे.

टॅग्स :state transportएसटी