शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक शाळेत 'सिक रूम' बंधनकारक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:56 IST

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय : गरजेनुसार डॉक्टर 'ऑन कॉल' सुविधा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शाळेत प्रथमोपचाराकरिता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी फर्स्ट एड किंवा सिक रूम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. 

राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा वेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील. विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे 

तपासणी शिबिरात द्यावे प्रशिक्षण शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास, कृत्रिम वायुजिवन व इतर तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत त्यांना प्रशिक्षिण देण्यात यावे. शाळेनजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये, शासकीय आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांच्याशी समन्वय ठेवण्यात यावा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत सदर समन्वयकाने रुग्णास तत्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यांस रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी. शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी तसेच जवळपासच्या डॉक्टरांशी ऑन कॉल सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करावेत व विद्यार्थ्यांना गरजेनुसार डॉक्टर ऑन कॉल सुविधा उपलब्ध द्यावी, असे निर्देशदेखील देण्यात आले.

समुपदेशक नेमा आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांकरिता शाळास्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची व्यवस्था करावी, या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत संचालक, उपसंचालकांनी मासिक आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मागदर्शन करणे देखील बंधनकारक आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावती