शिक्षकांच्या मागण्या : उपोषणाचा दुसरा दिवसअमरावती : विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अमरावती मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत खासगी शाळांचे मूल्यांकन करून त्यांना अनुदानास पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पात्र शाळांना अनुदान मंजूर करताना वितरणाबाबतच्या सर्वसामान्य नियमांचे पालन कसे करावे, याचा तपशील त्यानंतर निर्गमित करावयाच्या शासन निर्णयात देणे अपेक्षित आहे. परंतु शालेय शिक्षण विभागाने त्याप्रमाणे कारवई केली नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळांचा १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय सुधारित करण्यात यावा, अपंग समावेशित विशेष शिक्षक व परिचर यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून आदेश देण्यात यावे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या औरंगाबाद येथील मोर्चात सहभागी शिक्षकांवरील कलम ३०७ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शिक्षक आघाडीच्यावतीने आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता.गृहराज्यमंत्र्यांची भेटश्रीकांत देशपांडे यांच्या उपोषण मंडपाला मंगळवारी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी भेट देऊन सकारात्मक चर्चा केली. शिक्षक आघाडी व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्यावतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आ. श्रीकांत देशपांडे व आ. दत्तात्रय सावंत यांनी हे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून या उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
विनाअनुदानित शिक्षकांसाठी श्रीकांत देशपांडेचे मुंबईत आंदोलन
By admin | Updated: October 19, 2016 00:23 IST