अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या मुख्यालय परिसरात वनविभागाच्या लगत असलेल्या प्रवेशव्दारालगता अखेर केरकचरा उचण्यात आला आहे. या केरकचऱ्याकडे प्रशासनाचे लक्षवेधताच ही स्वच्छता करण्यात आली.
.........................
शहरात टरबुजाची आवक
अमरावती; कोरोनामुळे सध्या बाजार बंद करण्यात आले आहेत.त्यामुळे अनेक टरबुज उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील टरबुजाचा माल शहरात विक्रीस आणत आहेत.त्यामुळे टरबुजाच्या किंमती कमी झालेल्या आहेत.
...............................................
ग्रामीण भागात एसटील प्रवासी मिळेनात
अमरावती: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक बाबीवर निर्बंध लागू केले आहेत.परिणामी एसटी महामंडळाच्या ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद थंड असल्याचे दिसून येत आहे.
.................................
घरबांधणीसाठी वाळू मिळेना
अमरावती: शहरासह ग्रामीण भागात सध्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाची कामे सुरू आहेत.परंतु लाभार्थ्याना वाळू मिळत नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.