नांदगाव खंडेश्वर : नाफेडच्या तूर खरेदीकरिता तालुका खरेदी विक्री संघामार्फत ४ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी तूर नोंदणीकरिता ऑनलाईन सातबारा व त्यावर तलाठ्याचा सही, शिक्का, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या प्रती व नोंदणी अर्ज सोबत सादर करावेत, असे आवाहन तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विजय पाटेकर यांनी केले आहे.
------------
परतवाड्याच्या बसस्टॅन्डवरून दुचाकी लंपास
परतवाडा : येथील बसस्टँड परिसरातून एमएच २७ बीएक्स ७२१४ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी दीपक शेरेकार (४०, मिल कॉलनी, परतवाडा) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------------
फोटो पी ०२ अंजनगाव बारी
अंजनगाव बारी येथे स्वच्छता अभियान
अंजनगांव बारी : नववर्षाच्या निमित्ताने येथील स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्यात आला. तेथील झाडांना रंग देण्यात येणार आहे. यामध्ये गणेश नवखरे, सौरव भांडे, अक्षय बारबुद्धे, अजय जुमळे, अजय नवखरे, प्रशांत तलमले, रोशन जुमळे, राहुल गभणे, अक्षय केतकर, निखिल नवखरे, मयुर नवखरे, चेतन नवखरे, स्वप्निल कारमोरे, विजय मानापुरे, जय तलवारे, अभिषेक पांडे, अनिकेत कुबडे, अमित निचत, गौरव आगाशे, जय निखाडे, स्वप्निल माहेकर, मयुर चातरकर, गौरव नवखरे, अक्षय गोदे, सचिन अंबाडकर, भावेश पांडे, प्रवीण चोपकर यांनी सहभाग घेतला.
------------------------
बससेवा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा
टाकरखेडा संभू : कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे ग्रामीण भागातील बससेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहे. परंतु सद्यस्थितीत प्रादुर्भाव नियंत्रनात असल्याने आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने गावकºयांची येजा वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची होत असलेले हाल पाहता ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेऊन सदर ठराव आगार प्रमुखांना देण्यात आला आहे. परंतु त्यानंतरही बस सुरू न केल्याने तीव्र आंदोलन क रण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
------------
द्वारकाबाई तिवसेकर विद्यालयात शिष्यवृत्ती वाटप
टाकरखेडा संभू : चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथे श्रीमती द्वारकाबाई तिवसेकर विद्यालयात डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख तर प्रमुख अतिथी दिलीप बोबडे, अशोक देशमुख, अरूण देशमुख, जगदीश देशमुख, वृषाली बोबडे उपस्थित होते. यावेळी शाळेतून दहावीत पहिली आलेली विद्यार्थिनी ऋतुजा वानखडे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच सुमित तायडे, तेजस हिवसे, आचल सुकलकर, श्रावणी पोहोकर, वैष्णवी भोरजर, अपेक्षा गणोरकर, आयुष गद्रे यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका विद्या मेश्राम, संचालन चारूलता देशमुख व आभार रेखा देशमुख यांनी मानले.
--------------------------