४ कंपन्या सहभागी : १५,७७५ क्विंटल माल, ८.७७ लाखांचा लाभअमरावती : महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापित शेतकरी सामूहिक सेवा केंद्राद्वारा (शेतकरी कंपनी) फेब्रुवारी महिन्यात हमीभावात १५ हजार ७७५ क्विंटल तुरीची खरेदी केली. ही उलाढाल ७ कोटी ८५ लाख ६० हजारांची आहे. यामधून ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा फायदा या कंपन्यांना झालेला आहे. शेतमालास मिळणारा बाजारभाव हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर शेतीचे उत्पन्न निर्भर आहे. मात्र, बाजारपेठेत असणारी मध्यस्थांची मोठी साखळी व त्यांची एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर मात करण्यासाठी ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १५ कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने त्यांना अर्थसहाय्य देण्यात आले व कंपन्यांद्वारा फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांजवळील १५ हजार ७७५ क्विंटल तुरीची खरेदी केली. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये हमीपेक्षा कमी भावाने तूर व हरभऱ्याची विक्री होत असताना या शेतकरी कंपन्यांनी आधारभूत किमतीने हा शेतमाल खरेदी केला. ‘आत्मा’द्वारा स्थापित शेतकरी, उत्पादक कंपनीद्वारा छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाकरिता धान्याची खरेदी केली. यामध्ये त्यांना एक टक्का याप्रमाणे एका महिन्यात २ कोटी ७६ लाख रूपयांचा फायदा या कंपन्यांना झाला आहे. (प्रतिनिधी)शेतकरी कंपन्यांना एक टक्केच कमिशनछोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघाकरिता शेतकरी कृषी व्यापार संघांनी ७ कोटी ८५ लाख ६० हजारांची आर्थिक उलाढाल फेब्रुवारी महिन्यात केली. यामध्ये त्यांना एक टक्का याप्रमाणे ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा फायदा झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व बाजार समितींमध्ये हमीपेक्षा कमी भावाने तूर विकली जात असताना या शेतकरी कंपन्यांद्वारा नाफेडच्या धर्तीवर ही तूर खरेदी करण्यात आली. अशी झाली आर्थिक उलाढाल ‘आत्मा’द्वारे स्थापित धामणगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ९५२५ क्विंटल तूर व १२५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी केली. यासाठी त्यांनी ७ कोटी २४ लाखांची उलाढाल केली. उत्तमसरा शेतमाल कंपनीद्वारा एक हजार क्विंटल तूर खरेदी ५० लाख ५० हजारांची उलाढाल, पुसद्याच्या ग्रीन फ्युचर कंपनीद्वारा दोन हजार क्विंटल तुरीसाठी एक कोटी एक लाखांची तूर खरेदी व चंडिकापूर येथील अमरावती शेतकरी बियाण्यांद्वारा दोन हजार क्विंटल तुरीची खरेदी करून एक कोटी एक लाखांची आर्थिक उलाढाल केली. शेतकरी उत्पादक चार कंपन्यांद्वारा मागील महिन्यात हमीभावाने ‘स्पॅक’साठी खरेदी केली. यामध्ये त्यांना एक टक्का फायदा झाला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा याचा लाभ मिळाला. - गणेश जगदाळे, कृषी पणन् तज्ज्ञ
शेतकरी कंपन्यांद्वारा आठ कोटींची तूर खरेदी
By admin | Updated: April 2, 2017 00:11 IST