शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:30 IST

मुंबईहून आपल्या गावात परतल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा गावातल्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे.

ठळक मुद्देवडगाव राजदी येथील धक्कादायक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : मुंबईहून आपल्या गावात परतल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा गावातल्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली असून, चांदूर रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री त्याला अटक केली. हा प्रकार तालुक्यातील वडगाव राजदी या गावात घडला.रणजीत उर्फ प्रदीप हरिदास गजबे, असे या दारुड्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे.  धामणगाव तालुक्यातील वडगाव बाजदी येथे तो पोलीस पाटील असून, रिक्त असलेल्या वडगाव राजदी या गावाचा कार्यभार त्याच्याकडे होता. मागील सात दिवसांपूर्वी या गावातील मजूर जोडपे मुंबईहून आपल्या गावात परतले. ग्रामपंचायतीने येथील जिल्हा परिषद शाळेत या जोडप्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. शुक्रवारी जिल्ह्यात दारूची दुकाने उघडली. पोलीस पाटील त्याच दिवशी दारू पिऊन दुपारी गावात आला. जिल्हा परिषद शाळेत असलेल्या या जोडप्याजवळ जाऊन सदर महिलेला अश्लील भाषेत वर्तन करून हात पकडून सोबत चल, असे म्हणून शरीरसुखाची मागणी केली व मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी दिली.  इतर उपस्थितांच्या समोर घडलेल्या या घटनेत महिलेने आरडाओरड करताच पोलीस पाटील घटनास्थळावरून पळून गेला.  ग्रामपंचायत कर्मचारी व आशा सेविका आल्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. गावकऱ्यांनी शनिवारला रात्री चांदुर पोलिसांन पाचारण केले दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक शंकर ढोले व पो.का.पंकज शेंडे,विनोद वासेकर यांनी आरोपी पोलीस पाटलाला ताब्यात घेतले पोलीस पाटील यानेच हा घृणास्पद प्रकार केल्याने वडगाव राजदी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने चांदुर पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला होता. आरोपी रणजित उर्फ प्रदिप गजबे विरूध्द चांदूर रेल्वे पोलीसांनी भादंवी कलम ३५४ (अ), २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.चांदुर रेल्वे चे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस