शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: April 27, 2023 17:14 IST

मुलगी केवळ १३ वर्षांची : मुलगाही अल्पवयीन, मावशीही आरोपी

अमरावती : लैंगिक अत्याचार करण्याच्या कुहेतूने एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. तब्बल दीड दिवस तिला एका महिलेच्या फ्लॅटमध्ये डांबण्यात आले. २४ एप्रिल रोजी दुपारी २.३४ ते २६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह त्याचा मित्र व त्या अल्पवयीन मुलाच्या मावशीविरुद्ध विनयभंग, अपहरण, गुन्ह्यासाठी प्रेरित करणे व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २६ एप्रिल रोजी पहाटे १.३६ च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद घेतली.             तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगा व पीडित मुलगी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांचे एकमेकांशी बोलणेदेखील सुरू असायचे. २४ एप्रिल रोजी दुपारी २.३० च्या सुमारास त्या ओळखीतील अल्पवयीन मुलाने त्याच्या एका मित्राच्या मदतीने तिचे अपहरण केले. ते तिला दुचाकीवर बसवून त्यांच्या मावशीच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तेथे त्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत तिच्याशी गैरकृत्य केले. तिचा विनयभंग केला.

ती रात्रभर रडत राहिली

अकस्मात झालेले अपहरण व त्यानंतर फ्लॅटमधील गैरकृत्याच्या प्रयत्नामुळे ती १३ वर्षीय मुलगी नखशिखांत हादरली. तिने रडून अख्खा फ्लॅट डोक्यावर घेतला. मात्र, २४ ची संपूर्ण रात्र तिला त्याच फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले. वारंवार घरी सोडून देण्याची तिची विनंती धुडकावून लावण्यात आली, तर २५ ची सकाळ उजाडताच तिला ऑटोरिक्षासाठी पैसे देऊन तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.

दिवसरात्र शोधाशोध

मुलगी रात्र झाल्यानंतरही घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांची तगमग वाढली. शेजाऱ्यांसह तिच्या मैत्रिणी व नातलगांकडे विचारणा झाली. मात्र, तिचा शोध न लागल्याने पोलिसांतदेखील खबर देण्यात आली. २५ ला ती घरी पोहोचताच तिच्यावर तू रात्रभर कुठे होतीस, काय केले, अशा नानाविध प्रश्नांची सरबत्ती झाली. अखेर पालकांकडून धीर मिळाल्यानंतर तिने आपबीती कथन केली. धक्क्यातून सावरल्यानंतर तिच्या कुटंबीयांनी तिला घेऊन गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले तथा तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती