शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अमरावतीहून दर्यापूर मार्गे अकोल्याला प्रथमच ‘शिवशाही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकाची माहिती, मंगळवारपासून फेरी, जिल्ह्यातून सहा बस धावणार

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लाल परी’नंतर प्रवाशआंची सर्वाधिक पसंती लाभलेल्या शिवशाही बस मंगळवारपासून अमरावती मध्यवर्ती आगारातून इतर जिल्ह्यांत सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. एकूण सहा बसपैकी एक अमरावतीहून अकोल्याला दर्यापूर, म्हैसांग मार्गे प्रथमच सुरू करण्यात येत आहे. हा रस्ता ही महिन्यांपूर्वीच गुळगुळीत झाला आहे.अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या. मात्र, आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवासी व वाहनांची संख्या वाढली आहे. दर्यापूरहून जाणारे नोकरदार व किराणा व्यावसायिकांची बाजारपेठसुद्धा अकोला आहे. त्यामुळे शिवशाही बसला या मार्गावर प्रवासी मिळतील, हे निश्चित. मंगळवारी सकाळी ८ वाजता शिवशाही बस अमरावतीहून निघेल. ९.३० वाजता ही बस दर्यापूवरून अकोल्याला रवाना होईल. या मार्गावरील हा पहिलाच प्रयोग आहे. 

नागपूरकरिता चार शिवशाही बस अमरावती मध्यवर्ती आगारातून सहा शिवशाही बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. यामध्ये चार शिवशाही बस नागपूरकरिता, तर दोन अकोल्याकरिता सोडल्या जातील. ॲनलॉकमध्ये प्रवासी संख्या वाढल्यानंतर बस वाढविण्यात येतील. 

पूर्वी व्हायच्या १७०० फेऱ्या कोरोनापूर्वी जिल्ह्यातील ३७५ बसच्या १६०० ते १७०० फेऱ्या व्हायच्या. यामध्ये ७३ शिवशाही बस आहेत. आता कोविड नियमावलीनुसार १५० ते २५० बस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असून, त्याच्या ५०० ते ६०० फेऱ्या होणार आहेत. सोमवारपासून जिल्हा व तालुका पातळीवर बस सोडण्यात येतील. तूर्तास ग्रामीण भागात बस धावणार नसल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी स्पष्ट केले. 

एसटीला रोज ३० लाखांचा फटकाकोरोना काळापूर्वी एसटीला रोज ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये सहा महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येसुद्धा प्रवासी नव्हते. आता अनलॉकमध्ये फक्त दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. एसटीला दररोज ३० ते ३२ लाखांचा फटका बसत आहे.

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी