शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी’चा पुढाकार : दोन दिवसीय आयोजन आजपासून तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 20:57 IST

विदर्भातील तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन १० व ११ फेब्रुवारीला स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

अमरावती : विदर्भातील तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन १० व ११ फेब्रुवारीला स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या इतिहास परिषदेच्या ५० व्या अधिवेशनाच्या आयोजनाचा मान श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला मिळाला आहे. प्राचार्य स्मिता देशमुख उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहतील. इतिहास परिषदेचे अध्यक्ष पी.एन. उपाख्य बाबासाहेब देशमुख, सचिव शरद बेलोरकर हे परिषदेला प्रामुख्याने उपस्थित राहतील. शनिवार, १० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख नितीन चंगोले हे या परिषदेचे संयोजक आहेत. दुपारी ४ वाजता ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अरुणा राऊत यांच्या अध्यक्षतेत चंदा जगताप, प्रशांत कोठे, ज्योती खडसे, संजय ठवले, अरुण फरपट, नामदेव ढाले, नत्थू गिरडे, प्रकाश तायडे हे अभ्यासक परिसंवादात सहभागी होतील. सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवशीचा समारोप होईल. रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता ‘विदर्भाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक वारसा’ या विषयावर भूपेश चिकटे यांच्या अध्यक्षतेत आयोजित परिसंवादात राजू वाघ, सातभाई, गोविंद तिरमनवार, तीर्थानंद बझागरे, अनिल ठाकरे, आनंद भोयर, प्रमोद हयार, सच्चिदानंद बिच्चेवार हे विचार मांडतील. नंतर सकाळी १०.३० वाजता घनश्याम महाडिक, शीला उमाळे व गोविंद तिरमनवार हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करतील. दुपारी १ वाजता मलकापूर येथील श्रीमती के. के. अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर. राजपूत यांच्या अध्यक्षतेत आणि भूषण चिकटे व रवि वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. या परिषदेला इतिहासप्रेमी अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती संयोजक नितीन चंगोले यांनी केली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती