शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले

By गणेश वासनिक | Updated: July 9, 2023 17:35 IST

राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सायंकाळी ७ वाजता अमरावतीत येत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी लावण्यात आलेले पोस्टर शिवसैनिकांनी फाडून फेकले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वीची अमरावती शहरात राजकीय वातावरण तापले असून पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनासंदर्भात राणांनी शहरात जागोजागी पोस्टर लावले आहे. मात्र, या पोस्टरवर उद्धव ठाकरे सरकारने हनुमान चालिसा पठणाला विरोध केला आणि हनुमान चालिसा वाचल्याबद्दल खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. १४ दिवस जेलमध्ये टाकले, अशा आशयाचे मजकूर होते. पोस्टरवरील हे मजकूर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याने ते पोस्टर फाडून फेकले. आता याविषयी राणा दाम्पत्य कोणती भूमिका घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत. राणा समर्थकांनी हे पोस्टर उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरखाली लावल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि ते पोस्टर फाडले.बॅनरबाजीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

सोमवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या परिसरातच राणा दाम्पत्यांनी सकाळी ९ वाजतापासून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे ठिकठिकाणी लावले आहे. मात्र, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हे बॅनर्स फाडून टाकले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी हनुमान चालिसा पठण करून राणा दाम्पत्यांचा निषेध केला. शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी आणि शिवसैनिकांनी शहरातील राणा दाम्पत्यांनी लावलेले पोस्टर फाडले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा