शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीच्या आजीबाईंची ‘या’ कारणासाठी शिल्पा शेट्टीने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 13:14 IST

लक्ष्मी ताथोडकर यांचा नृत्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हायरल झाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘आजीबाई, तुझी फॅन झाले’, अशा ओळी लिहिल्या.

ठळक मुद्देनृत्य समाज माध्यमावर व्हायरलखासगी वाहिनीवर होणार सादरीकरण

अजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मोर्शी येथील ७५ वर्षीय आजी २५ दिवसांत समाज माध्यमावर ‘स्टार’ झाली आहे. झपाट्याने व्हायरल होत असलेल्या तिच्या व्हिडीओला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या खासगी अकाऊंटवर जागा दिली. खासगी वाहिनीवरील ‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमात त्याचे सादरीकरण होणार आहे.

मालवीयपुरा येथील ७५ वर्षीय लक्ष्मी भास्करराव ताथोडकर यांना बालपणापासून नृत्य व गायनाची आवड होती. पण, त्यांना व्यासपीठ लाभले नाही. लॉकडाऊनपूर्वी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने नाशिक येथील नातजावई संकेत सुखदेव पाटील हे मोर्शी येथे भेटीकरिता आले. याच सुमारास लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे संकेत पाटील यांना नाशिक येथे परत जाता आले नाही. ते मोर्शीतच मुक्कामी होते. यादरम्यान त्या ठणठणीत झाल्या. आपल्या आजेसासूला नृत्याची आवड असल्याचे कळताच संकेत यांनी हिंदी चित्रपट गीतांवरील लक्ष्मी ताथोडकर यांचा नृत्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला.

तो व्हायरल झाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘आजीबाई, तुझी फॅन झाले’, अशा ओळी लिहिल्या. निवेदक नीलेश साबळे यांनीही लक्ष्मी ताथोडकर यांची दखल घेतली. सिनेतारका सोनाली कुलकर्णी आजीबार्इंच्या अदाकारीला सलाम असल्याची प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocialसामाजिक