शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘ती’चा रेल्वेसमोर झोकून देण्याचा प्रण; तितक्यात पोहोचली ‘खाकी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 23:24 IST

अमरावती-बडनेरा रेल्वे ट्रॅकवरील सिपना कॉलेजजवळील रेल्वे रुळावर ­४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी तिचे प्राण वाचविले. तिचे समुपदेशन करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. एक २२ वर्षीय तरुणी मानसिक तणाव व नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात  सिपना कॉलेजजवळ रेल्वे रुळावर पळत असल्याची माहिती राजापेठच्या बिट मार्शलला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बस्स... संपले... आता जगायचेच नाही. आता केवळ मरणच, असा आततायी विचार करून तिने चक्क बडनेरा रोडवरील रेल्वे ट्रॅक गाठला. रेल्वेसमोर झोकून देऊन प्राण त्यागायचे, असे मनोमनी ठरवत ती रेेल्वे ट्रॅकवर सुसाट धावू लागली. ती माहिती मिळताच ‘खाकी’ही पोहोचली. ती पुढे, अन् खाकी मागे. अखेर १५/२० मिनिटांनी महिला पोलिसांनी तिला ट्रॅकवरून मागे सारले. तिचा लाखमोलाचा जीव वाचला. अमरावती-बडनेरा रेल्वे ट्रॅकवरील सिपना कॉलेजजवळील रेल्वे रुळावर ­४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी तिचे प्राण वाचविले. तिचे समुपदेशन करून तिला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. एक २२ वर्षीय तरुणी मानसिक तणाव व नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात  सिपना कॉलेजजवळ रेल्वे रुळावर पळत असल्याची माहिती राजापेठच्या बिट मार्शलला मिळाली. त्यांनी त्याबाबत  ठाणेदार मनीष ठाकरे यांना लागलीच कळविले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनीष ठाकरे ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळ बडनेरा ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथील पोलिसांनाही माहिती देण्यात आली. सोबतच ठाणेदार मनीष ठाकरे यांनी रेल्वे पोलीस निरीक्षक शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबविण्यास सांगितले. दामिनी पथकालाही पाचारण करण्यात आले.

ती समोर अन् पोलीस मागे ठाणेदार ठाकरे तेथे पोहोचले असता, ती तरुणी रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसली. महिला पोलिसांनी तिला साद घातली. मात्र कुठलाही प्रतिसाद न देता ती धावत राहिली. ती समोर अन् पोलीस मागे. अखेर एक किमी अंतरावर ती स्वत:च थांबली. महिला पोलिसांनी लागलीच तिला रेल्वे ट्रॅकच्या दूर नेले.  यावेळी ठाणेदार मनीष ठाकरे यांनी तिची विचारपूस केली. त्यामुळे ती आत्महत्येच्या आत्मघातकी विचारांपासून मागे फिरली.  तिने मानसिक व आर्थिक तणावात असल्याचे सांगितले. बराच वेळ समजूत काढल्यानंतर ती शांत झाली. त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. 

गटागटा पाणी पिली, असंबद्ध बडबडठाणेदार ठाकरे यांच्यासह महिला पोलीस अधिकारी, अंमलदारांनी तिला प्रथम धीर दिला. तिच्याकडून कारण समजून घेतले. मात्र, पहिला अर्धा तास ती असंबद्ध बडबडत राहिली. पुढे बॉटलभर पाणी गटागट पित तिने दीर्घ उसासा सोडला. मॅथची शिकवणी लावावी लागेल, त्यासाठी २१ हजार रुपये महिना द्यावा लागेल, तेवढे पैसे नाहीत, मी लहानग्यांची ट्यूशन घेते. मात्र त्यातून केवळ घरखर्च भागतो, पुढे काय, असा प्रश्न तिला पडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आर्थिक विवंचना आणि त्यापाठोपाठ आलेल्या मानसिक नैराश्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, खाकीच्या सजगतेने तिचे प्राण वाचले.

 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस