शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

शेख जफरचा सुगावा पोलिसांना लागेना

By admin | Updated: November 30, 2014 22:56 IST

चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर हा सात दिवसांपासून पसार आहे. मात्र त्याचा सुगावा अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही. बडनेरा फार्म हाऊसवरुन जफरने

गोळीबार प्रकरण : कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हअमरावती : चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर हा सात दिवसांपासून पसार आहे. मात्र त्याचा सुगावा अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही. बडनेरा फार्म हाऊसवरुन जफरने पलायन केले. मात्र तो कुठे व कसा पळून गेला याचा थांगपत्तासुध्दा पोलिसांना लागलेला नाही. २३ नोव्हेंबर रोजी जुन्या वैमनस्यातून भरदिवसा चांदणी चौकात दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील सदस्य परस्परांविरुध्द तक्रार करण्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांच्यात ठाण्यासमोरच वाद झाला. पोलिसांनी चौघांना पकडले. ठाण्यासमोर त्यांनी वाद घातल्याने ते पोलिसांच्या तावडीत सापडले. सध्या या चारही आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र सात दिवस पोलीस कोठडी घेऊनही आरोपींकडून अद्यापपर्यंत कोणतीही कबुली पोलीस मिळवू शकले नाहीत. दुसरीकडे गोळीबार प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असताना शेख जफरच्या मदतीसाठी तब्बल बारा नगरसेवक सरसावले. ते आपल्या सहीनीशीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यासाठी गेले होते. कित्येकदा दोष नसताना केवळ तक्रारीत नाव आहे म्हणून सामान्य व्यक्तीला पोलीस लगेच बेड्या ठोकतात. परंतु शेख जफरसारखा कुख्यात गुंडाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. सात दिवसांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी होत असल्याने या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लावले जात आहे. शेख जफर प्रकरणासंदर्भात माध्यमांचे प्रतिनिधी पोलिसांकडे विचारणा करण्यास गेल्यानंतर त्यांच्याकडून माहिती दडवून ठेवली जात आहे. वृत्तपत्रातील माहितीवरुन जफर आपले स्थान बदलवीत असल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवला जात आहे. दुसरीकडे त्याचा कसून शोध घेतला जात आहे, असे सांगून पोलीस वेळ काढू धोरण अवलंबत आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या या एकूणच कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.