‘तिला’ जायचे आहे मानलेल्या नवऱ्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:44 AM2017-12-12T00:44:46+5:302017-12-12T00:45:11+5:30

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना मानलेल्या नवऱ्यावर एका महिलेने तीन महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता.

She is going to go to her husband | ‘तिला’ जायचे आहे मानलेल्या नवऱ्याकडे

‘तिला’ जायचे आहे मानलेल्या नवऱ्याकडे

Next
ठळक मुद्दे‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये फरफट : पोलीस, समाजसेवी यंत्रणा वैतागली

आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना मानलेल्या नवऱ्यावर एका महिलेने तीन महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता गेल्या तीन दिवसांपासून ती फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात येऊन नवऱ्याकडे सोडून देण्याचा तगादा लावत आहे. तिच्या विचित्र मागणीने पोलिसांपुढे पेच उभा ठाकला आहे.
फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३० वर्षीय महिला एका इसमासोबत ‘लिव्ह इन...’मध्ये राहात होती.
महिलेला पहिल्या पतीपासून झालेला आठ वर्षाचा मुलगाही सोबत राहात होता. मानलेल्या पतीपासून गर्भवती झाल्याचे ती पोलिसांना सांगत आहे. मात्र दरम्यान दोघांमध्ये खडके उडाले. सोबतच कुंटुबातील काही सदस्यसुद्धा त्या महिलेची हेटाळणी करू लागले. ती नऊ महिन्यांची गर्भवती असताना तिने मानलेल्या पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी नोंदविली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तिला एका चॅरिटी होममध्ये पाठविले. तेथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
पोलिसांकडे येरझारा
काही दिवसात ती तेथेही राहायला तयार नव्हती. त्यामुळे तिला पोलिसांनी अकोला येथील महिला सुधारगृहात पाठविले. मात्र, तेथेही ती राहीली नाही. घरापासून तुटलेल्या त्या महिलेची भटकंती होऊ नये, या उद्देशाने पोलिसांनी वसुंधरा संस्थेकडे तिची जबाबदारी दिली. मात्र, तेथेही तिचा टिकाव लागला नाही. त्यानंतर पुन्हा ती पोलिसांकडे आली. पोलिसांनी पुन्हा तिला मार्गदर्शन व समुपदेशन केले.
त्यानंतर तिला महिला तक्रार निवारण केंद्र वन स्टॉप सेन्टरमध्येही ठेवण्यात आले. मात्र, ती तेथेही राहायला तयार नव्हती. गेल्या तीन दिवसांपासून ती महिला सतत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात येते आणि तेथील खुर्चीवर बसून नवऱ्याकडे सोडून देण्याचा तगादा पोलिसांकडे लावत आहे. पोलीस व समाजसेवी संस्था तिला समजाविण्याचे अथक परिश्रम घेत आहेत. मात्र, आता तेही या प्रकाराने त्रस्त झाले आहेत.
ठाणेदार भडकले
ती महिला दररोज ठाण्यात येऊन नवºयाकडे सोडून द्या, असा आग्रह पोलिसांकडे धरते. मात्र, या मानलेल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली असल्यामुळे आता तो तिला घरी ठेवणार तरी कसा, असा पेच पोलिसांपुढे आहे. याशिवाय ही बाब पोलिसांच्या कार्यक्षेत्राचा भाग नाही. सोमवारी त्या महिलेस वन स्टॉप केअर सेन्टरवर पोलीस पाठविणार होते. मात्र, ती जायला तयार नव्हती. मी आत्महत्या करेन किंवा तीन महिन्याच्या बाळाला मारून टाकेन, अशा धमक्या तिने पोलिसांना दिल्या. त्यामुळे फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार आसाराम चोरमलेंचा राग अनावर झाला आणि ते चांगलेच भडकले. तिने दिलेल्या धमक्यांची नोंद ठाणेदारांनी पोलीस रेकॉर्डवर घेतली असून, तिला न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश ठाणेदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले होते.

महिलेनेच पतीवर आरोप केले. त्यामुळे तो ठेवणार कसा? महिला सुधारगृहात राहायला ती तयार नाही. उलट तीच मुलाला मारण्याची व आत्महत्येची धमकी देत आहे. तिला न्यायालयापुढे हजर करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- आसाराम चोरमले,
पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा पोलीस ठाणे.

Web Title: She is going to go to her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.