शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

नरबळी प्रयत्नामागे शंकर महाराज !

By admin | Updated: October 14, 2016 01:02 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांच्या नरबळीचा जो प्रयत्न झाला,

शासनाला प्रत : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सत्यशोधन अहवाल अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांच्या नरबळीचा जो प्रयत्न झाला, तो आश्रमाचे सर्वेसर्वा शंकर महाराज यांच्या इशाऱ्यावरून झाला असल्याचा निष्कर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्यशोधन अहवालात मांडला आहे. समितीने १२ पानांचा सत्यशोधन अहवाल शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या अहवालाची प्रत पाठविण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या अहवालात अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केलेली तत्थ्ये पोलीस आणि न्यायिक अधिकाऱ्यांना दुर्लक्षित करता येणार नाहीत, अशीच आहेत. समाजातील अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, परंपरा व घातक अंधश्रद्धांच्या विरोधात सनदशीर मार्गाने व्यापक लोकप्रबोधन करीत आलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३४ वर्षांत हजारो बुवा-बाबा, ढोंगी देवी-देवता, मांत्रिक-तांत्रिकांचा जाहीर भांडाफोड केला असल्याचा परिचय समितीच्या सत्यशोधन अहवालात प्रारंभीच देण्यात आला आहे. अहवालानुसार, शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यापूर्वीही अनेक अपमृत्यू झाले आहेत. चार विद्यार्थ्यांसह एकूण पाच जणांच्या संशयास्पद मृत्युंची माहिती समितीने नावांसह या अहवालात नमूद केली आहे. पाच एकर जमीन आणि साडेतीन हजार रुपये रोख इतकी अल्प संपत्ती १९९५ साली आश्रमाकडे होती. आज ही संपत्ती कैकपटीने वाढून ३५० एकर जमीन झाली. त्यातील २०० एकर जमीन ट्रस्ट व कृषी महाविद्यालयाच्या नावे तर उर्वरित १५० एकर जमीन शंकर महाराजांच्या नातेवार्इंकांच्या नावाने आहे. पुणे, पंढरपूर यासह अनेक ठिकाणी आश्रमाच्या जमिनी असल्याची तत्थ्ये अहवालात अधोरेखित केली आहेत. १२ पानांच्या या अहवालातील हे मोजकेच ठळक मुद्दे होत. विस्ताराने लिहावे, अशी अनेक धक्कादायक तत्थ्ये या अहवालात आहेत. नरबळी प्रकरणात शंकर महाराज, त्यांचे नातेवाईक आणि विश्वस्त हे आरोपी असल्याची अनेक कारणे दिली आहेत. सर्वांवर नरबळीविरोधी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईची गरजही समितीने व्यक्त केली आहे. कजलीवाला शंकर बुधाजी नागपुरे उर्फ शंकर महाराज यांना कजलीवाला म्हणून लोक पूर्वीपासून ओळखतात. काजळी धरलेल्या ताटात किंवा आरशात बघून हरविलेली वस्तू, जमिनीखालचे पाणी, गुप्तधन इत्यादी शोधण्यासाठी वापरली जाणारी तथाकथित अंधश्रद्धाळू विधी म्हणजे कजली. या विधीचा उपयोग करून, अंतर्दृष्टी असल्याचे भासवून, वस्तू, धन, पाणी वगैरे शोधण्याचा जो दावा करतो त्याला कजलीवाला म्हणतात, असा शंकर महाराजांविषयीचा शोध-इतिहास अहवालात उघड करण्यात अला आहे. असा केला अभ्याससत्यशोधन समितीने ३५ दिवस शोधकार्य केले. चमू तीनवेळा शंकर महाराजांच्या आश्रमात जाऊन आली. आश्रमातील लोक, शंकर महाराजांचे भक्त, पूर्वी आश्रमाशी संबंधित असलेले पिंपळखुट्यातील नागरिक, इतर गावकरी, तपास अधिकारी, अंजनसिंगी, अंजनवती, कावली, कुऱ्हा, वरूडा, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, अमरावती, धानोरा म्हाली गावातील नागरिकांशी समितीने संपर्क साधला. अजय वणवे, प्रथमेश सगणे आणि अटकेतील आरोपींच्याही नातेवार्इंकांशी चर्चा केली. माहितीची शहानिशा केली. धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, अंजनसिंगी, अमरावती येथे सर्वपक्षीय मोर्चे निघालेत. कडकडीत बंद पाळलेत. त्या आंदोलकांशीही संवाद साधला. माध्यमांशी चर्चा केली. या समितीत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे, जिल्हा संघटक शेखर पाटील, तत्कालीन जिल्हा संघटकद्वय राजीव खिराडे आणि मंगेश खेरडे यांचा समावेश आहे.