गुन्हा : जप्तीनंतर दोन ब्रास गिट्टी गायबवरुड : तालुक्यात अवैध गौण खनिजांची चोरीकरणाऱ्याविरोधात कारवाईचे धाडसत्र सुरू आहे. परंतु खुद्द तहसीलदारांनी जप्त केलेला ट्रक सुटीची संधी साधून ट्रकमालकाने परत नेला आणि त्यातील दोन ब्रास गिट्टी रिकामी करुन तो पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवला. ही अफलातून घटना वरुड येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी महसूल विभागाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.विना रॉयल्टी गिट्टीची वाहतूक करणारा ट्रक तहसीलदाराने जप्त करुन कारवाई केली. परंतु सुटी असल्याची संधी साधून मध्यरात्रीनंतर महसूल विभागाच्या आवारातील जप्त ट्रक घेऊन मालकाने यातील ३ पैकी २ ब्रास गिट्टी खाली केली. तसेच तो ट्रक पुन्हा महसूल विभागाच्या आवारात आणून ठेवला. या प्रकाराबाबत नायब तहसीलदार देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ट्रक मालकाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. परंतु जप्त ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून बाहेर कसा गेला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. २३ डिसेंबरला सायंकाळी महसूल विभागाच्या भरारी पथकाने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रक क्र. सी.जी०७-९६४ ओव्हरलोड आणि विनापरवाना गिट्टीची वाहतूक करीत असताना पकडला. या ट्रकमध्ये ३ ब्रास गिट्टी विनापरवानगी नेली जात होती.
जप्त केलेल्या ट्रकलाही फुटले पाय
By admin | Updated: December 26, 2015 00:28 IST