शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्षे सतरा; मोबाईल हिसकावले अठरा! मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची गॅंग ताब्यात

By प्रदीप भाकरे | Updated: January 25, 2025 13:13 IST

Amravati : सात मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकीदेखील जप्त, राजापेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी

अमरावती : रात्रीच्या वेळेस रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी फिरणाऱ्या लोकांच्या मागून भरधाव वेगाने बाईकने येऊन त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या आठ जणांच्या अल्पवयीनांच्या गॅंगचा राजापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्या आठ विधीसंघर्षित बालकांकडून ७१ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल व गुन्हयात वापरलेल्या २.८० लाख रुपये किमतीची एक बाईक व तीन मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वातील डीबी स्कॉडने २३ जानेवारी रोजी ही मेगा कारवाई केली.             

राजापेठ पोलिस ठाण्यात यंदा नोंद असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या दोन घटनांचा तपास करत असताना महेंद कॉलनी येथील चार, शाम नगर येथील तीन व भातकुली पंचायत समिती परिसरात राहणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकांनी राजापेठ व चार, फेजरपुरा पोलिस ठाण्यााच्या हद्दीतून पत्येकी चार व गाडगेनगर हद्दीतून दोन असे दहा मोबाईल फोन जबरीने चोरी केल्याबाबतची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तुर्तास त्यांच्याकडून सात मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्या तरी तपासादरम्यान मोबाईल स्नॅचिंगचे आणखी काही गुन्हे उलगडण्याची शक्यता असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. चैनीसाठी ती अल्पवयीनांची टोळी मोबाईल हिसकावत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, प्रभारी पोलीस उपायुक्त तथा सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट, डीबी स्कॉड प्रमुख तथा पोलिस उपनिरिक्षक मिलिंद हिवरे, हवालदार मनिष करपे, अंमलदार रवी लिखीतकर, पंकज खटे, गणराज राऊत, विजय राऊत, सागर भजगवरे यांनी ही कारवाई केली. शहर आयुक्तालयातून मोबाईल गेले होते मागील वर्षी चोरीला. पैकी केवळ ७ मोबाईल मिळाले होते."अल्पवयीनांची सात आठ जणांची टोळी बाईक वा मोपेडने मागून येऊन पायदळ जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे शहरातील विविध ठिकाणाहून त्या आठ मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सात मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या."

- पुनित कुुुलट, ठाणेदार, राजापेठ

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी