शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

भीषण आगीत सात दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना व अग्निशमन विभागाला दिली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कार्यालय परिसरातच असल्याने पाण्याचे बंब तातडीने दाखल झाले. आग विझली तेव्हा सातही दुकानातील साहित्याचा कोळसा झाला होता. यामध्ये रशीद ऑटो डीलमधील दरवाजा, वायरिंंग व इतर साहित्य जळाले.

ठळक मुद्देमालवीय चौक : पहाटे ४.३० वाजता अग्नितांडव; दुचाकी, टायर बेचिराख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मालवीय चौकात असलेल्या टायर व ऑटो डीलच्या दुकानांना बुधवारी पहाटे ४.४५ वाजता भीषण आग लागली. यात सात दुकाने जळून खाक झाली. दुकानातील दुचाकी, टायर व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन विभागाच्या चार बंबांनी आगीवर चार तासांनी नियंत्रण मिळविले. सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना व अग्निशमन विभागाला दिली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कार्यालय परिसरातच असल्याने पाण्याचे बंब तातडीने दाखल झाले. आग विझली तेव्हा सातही दुकानातील साहित्याचा कोळसा झाला होता. यामध्ये रशीद ऑटो डीलमधील दरवाजा, वायरिंंग व इतर साहित्य जळाले. अप्सर ऑटो डील, अखिल ऑटो डीलमधील संपूर्ण साहित्य जळाले. लक्ष्मी टायर मधील जुने व रिमोल्ड टायर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. रॉयल ऑटो डीलचे साहित्य जळाले. मलखान ऑटो डीलमधील साहित्य व २० दुचाकी बेचिराख झाल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शक्ती ऑटो डीलमधील टायर व दोन दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन विभाग व पोलिसांनी दिली. रात्रकालीन कर्तव्यावर असलेले अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले.

टॅग्स :fireआग