शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

वन विभागात वरिष्ठांना ५ वर्षांतच बढती? वनरक्षकांना १५ वर्षांची प्रतीक्षा, सहायक वनसंरक्षकांची निवड सूची तयार

By गणेश वासनिक | Updated: May 16, 2023 13:40 IST

वन विभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना, रोहयो असे उपविभाग तयार करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस धोरण आखले नाही.

  अमरावती : राज्याच्या वन विभागात सहायक वनसंरक्षक ते अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदांना ५ ते ६ वर्षांतच पदोन्नती दिली जाते. मात्र, वनरक्षक ते वनपरिक्षेत्राधिकारी यांना पदोन्नतीकरिता १५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. वन विभागात कनिष्ठांना पदोन्नती देताना विषमता दिसून येते. वन विभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना, रोहयो असे उपविभाग तयार करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस धोरण आखले नाही. महाराष्ट्रात वनरक्षक ते वनपरिक्षेत्राधिकांऱ्यांच्या पदोन्नतीत केवळ एकच वनपाल पद आहे. तर मध्य प्रदेशात वनपाल ते वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहायक वन क्षेत्रपाल पद निर्माण करण्यात आले आहे. 

आयएफएस लॉबीने फायद्यासाठी केली पदनिर्मितीराज्याच्या वन विभागात आजमितीला वनरक्षक ९०००, वनपाल २८०० तर वनपरिक्षेत्राधिकारी ९९५ एवढीच पदे आहेत. मात्र, वरिष्ठ स्तरावर आता सात प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि २१ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, ४० मुख्य वनसंरक्षक, ११० उपवनसंक्षकांची फौज आहे. दरम्यानच्या काळात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षकाची पदे दुप्पट वाढविण्यात आली आहेत. 

वन कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत दुय्यम स्थान  किमान १० वर्षांत वन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे शासन धोरण असताना याचे पालन वन विभागात होत नाही. वास्तविक पाहता सर्वात खालचा पाया असलेल्या वनरक्षक, वनपालांना पदोन्नतीचा लाभ ८ वर्षांत मिळावा. मात्र, असे होताना दिसून येत नाही.  आरएफओ हे पद राजपत्रित असतानासुद्धा त्यांची पदे वाढविण्यात आली नाहीत. परिक्षेत्राचे विभाजन केले नाही. 

सहायक वनसंरक्षकांना ५ वर्षात बढती  सहायक वनसंरक्षक गटातून विभागीय वनाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यासाठी कार्मिक विभागाने १०७ एसीएफ यांची यादी प्रकाशित केली आहे. यातील ८५ एसीएफ यांना बढती मिळणार आहे. या यादीत ज्या सहायक वनसंरक्षकांना प्रशिक्षण वगळून सेवेत ५ ते ६ वर्षे झाल्यानंतर पदोन्नती मिळणार आहे. यातील बहुतांश एसीएफ यांनी पदोन्नतीनंतर  फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावतीGovernmentसरकार