शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सेमाडोह ते हतरू मार्ग नादुरुस्त, ३० गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जून २०१९ पासून हा रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंतही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाने सदर मार्गावर बस फेरी सुरू करण्याचे पत्र परतवाडा आगाराला दिले होते. त्यावर १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक निरीक्षक नीलेश मोकलकर यांनी सदर रस्त्याचे एसटी बस नेऊन निरीक्षण केले.

ठळक मुद्देरस्ता निरीक्षण अहवाल : एसटी फेरी बंद, केवळ सहा किलोमीटर मार्गाचे सिमेंटीकरण, आदिवासी संत्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील सेमाडोह ते हतरू या ४६ किलोमीटर अंतरात ३० किलोमीटरपेक्षा अधिकचा रस्ता नादुरुस्त, खड्डेमय असल्याने यावर प्रवासी बसफेरी चालविणे शक्य नसल्याचा अहवाल परतवाडा आगारातर्फे देण्यात आला.त्यामुळे नऊ महिन्यांच्या ‘बे्रक’नंतरही या मार्गावर बसफेरी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. या मार्गातील बसफेरी बंद झाल्याने आजूबाजूच्या ३० गावांतील हजारो नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जून २०१९ पासून हा रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंतही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाने सदर मार्गावर बस फेरी सुरू करण्याचे पत्र परतवाडा आगाराला दिले होते. त्यावर १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक निरीक्षक नीलेश मोकलकर यांनी सदर रस्त्याचे एसटी बस नेऊन निरीक्षण केले. त्यामध्ये या मार्गाचे केवळ सहा किलोमीटरपर्यंत सिमेंटीकरण करण्यात आले; उर्वरित मार्ग खडतर आणि खड्डेमय असल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. त्यामुळे सदर मार्गावर प्रवासी बसफेरी चालविणे धोकादायक असल्याचा अहवाल त्यांनी दिला. सेमाडोह ते हतरू हा मार्ग परिसरातील जवळपास ३० पेक्षा अधिक आदिवासी खेड्यांना तालुका व जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे नऊ महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्यामुळे या ३० गावातील नागरिकांना पायदळ किंवा कारंजखेडा, जारीदा, चुनखडी अशा लांब पल्ल्याच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.सेमाडोह ते हतरू रस्त्याचे निरीक्षण करण्यात आले. सदर मार्गावर खड्डे असल्याने व संपूर्ण मार्गच नादुरुस्त असल्याने प्रवासी वाहतूक करणे धोकादायक आहे. त्यामुळे मार्गावर एसटी बस धावणे, पाठविणे शक्य नाही.- नीलेश मोकळकर, वाहतूक निरीक्षक, परतवाडा आगार

टॅग्स :Chikhaldaraचिखलदराstate transportएसटी