अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पस्थळी असलेले भूकंपमापक यंत्र बंद असल्यामुळे साद्राबाडी येथील भूकंपविषयक नोंद होऊ शकली नाही, हे उत्तर बेजबाबदारपणाचे असल्याची तंबी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली.भूकंपमापक यंत्र असलेल्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना भूकंपाच्या तीव्रतेबाबत विचारणा करण्यात आली असता, भूकंपमापक यंत्र बंद असल्याचे कळविण्यात आले. याविषयीचा कोणताही अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आलेला नाही. नैसर्गिक आपत्तीसारख्या विषयावर जिल्हा प्रशासन गंभीर असताना, या विषयावर मात्र पाटबंधारे विभाग गंभीर नसल्याचे या उत्तरावरून स्पष्ट होते, असा अभिप्राय जिल्हाधिकाºयांनी नोंदविला. याविषयी कार्यकारी अभियंत्याला पत्र लिहून भूकंपमापक यंत्र बंद असल्याने भूकंपाची तीव्रता कळू शकली नाही. भविष्यात अनुचित प्रकार उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा, पाटबंधारे विभाग यांची राहील, अशी लेखी तंबी जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांच्या संपर्क साधला असता भूकंपमापक यंत्र खरेदीचे अधिकार ‘मेरी’ला असल्याचे सांगितले.कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. भूकंपमापक यंत्र बंद असणे ही बाब गंभीर आहे. या विभागाने मागणी केली असती, तर जिल्हास्तरावर निधीची उपलब्धता करता आली असती.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी
भूकंपमापक यंत्र नादुरुस्त, जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:49 IST
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पस्थळी असलेले भूकंपमापक यंत्र बंद असल्यामुळे साद्राबाडी येथील भूकंपविषयक नोंद होऊ शकली नाही, हे उत्तर बेजबाबदारपणाचे असल्याची तंबी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली.
भूकंपमापक यंत्र नादुरुस्त, जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांना मागितला खुलासा