शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाची धास्ती, मदतीचे हातही!

By admin | Updated: April 28, 2015 00:17 IST

नेपाळसह देशातही भूकंपाचे धक्के बसल्याने अमरावतीत भितीची लकेर उमटली आहे.

अनेक ठिकाणी जाणवली कंपणे : चर्चांना ऊत, निसर्गाचा प्रकोप भोवणार काय?, आपात्कालिन यंत्रणा सज्ज लोकमत विशेषवैभव बाबरेकर अमरावतीनेपाळसह देशातही भूकंपाचे धक्के बसल्याने अमरावतीत भितीची लकेर उमटली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रांमधून मिळणारी माहिती नागरिक जाणून घेत आहेत. भूकंपाचा अनुभव घेताना अमरावतीकरांनी माणुसकीचा परिचयदेखील दिला आहे. नेपाळच्या दिश्ेने मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शनिवारी झालेल्या भूकंपाची उर्ध्ववर्धा धरणावरील भूकंपमापक यंत्रावर नोंद करण्यात आली. त्यामध्ये रिस्टर स्केलवर ५.५ आणि ५.१ इतकी नोंद झाली. अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परतवाडा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तसेच अमरावती शहरातही भूकंपाचा अनुभव नागरिकांनी घेतला. नेपाळ येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्यामुळे तेथे सर्वाधिक प्राणहानी व आर्थिक हानी झाली. रविवारी नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. भूगर्भात सातत्याने हालचाली होत असतात. मात्र, त्यांची तीव्रता अधिक असल्यास भूकंपाचे धक्के जाणवतात, असे भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यालगतच भूकंपाचे धक्के जाणवल्याने आता अमरावतीकरही प्रचंड धास्तावले आहेत. निसर्गाच्या प्रकोपाचा सामना आपल्यालाही तर करावा लागणार नाही ना, असा सवाल आहे. अशाही स्थितीती अमरावतीहून नेपाळसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची चमू रवाना करण्यात आली. जिल्ह्यात ५० जणांचे शोध व बचाव पथकजिल्ह्यात ५० शासकीय कर्मचाऱ्यांचे शोध व बचाव पथक तैनात आहे. त्यांना आग, वीज, भूकंप या विषयाचे आपात्कालिन प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये शहर व ग्रामीण पोलीस, एसआरपीएफ, होमगार्ड, एनजीओ, वैद्यकीय सेवा पथक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्थ सर्व विभागांचे पथक तयार आहे. वाशिम येथील १५० नागरिक सुरक्षितवाशिम जिल्ह्यातील १५० पर्यटक नेपाळला गेले होते. ते सर्व सुरक्षित आहेत. सध्या ते नेपाळ येथील लुंबिनी येथे आहेत. अकोला येथे देशमुख नामक पर्यटक काठमांडूला आहे. सोमवारी ते विमानाने पोहोचणार आहेत. अन्य जिल्हे निरंक असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अमरावतीचे १६ पर्यटक अयोध्या येथे दाखलनेपाळमधील भूकंपामुळे अमरावतीचे ३० पर्यटक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अमरावतीमधील १६ पर्यटक काठमांडू येथे गेले होते. ते परतीच्या प्रवासात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील शिलाबेन पोपट यांचे कुटुंबीय नेपाळ येथील काठमांडू येथे गेले होते. गोरखपूरमार्गे भारतात अयोध्या येथे सोमवारी ते दाखल झालेत. ३ मे रोजी ते अमरावतीत दाखल होतील. भूकंपाचे धक्के जाणवल्यास काय कराल?भूकंपाच्या धक्क्यांपासून संरक्षणासाठी सर्वात आधी इमारतीचा पाया मजबूत ठेवणे आवश्यक आहे. कंपणे जाणवल्यास सर्वप्रथम घराबाहेर धाव घेऊन मोकळ्या मैदानात जावे, तत्काळ आपात्कालिन शासकीय विभागाशी संपर्क करावा. भूकंपातील मृतांना झेडपीत श्रध्दांजलीनेपाळसह देशातील उत्तरप्रदेश व बिहार येथे झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे सभापती व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळले.भारताच्या नैसर्गिक स्थितीवरून चार झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ३८ शहरे हायरिस्कमध्ये येतात. अमरावती दुसऱ्या व तिसऱ्या झोनमध्ये असून धोका कमी आहे. मात्र सौम्य धक्याने हानी होऊ नये, यासाठी इमारतींचा पाया मजबूत करावा.-सैय्यद फजल रहेमान खादरी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती विद्यापीठसर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांशी चर्चा केली असता शहरातील कोणीही नेपाळमध्ये नसल्याची माहिती आहे. खासगीरीत्या १६ जण काठमांडूला गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधून स्थिती जाणून घेतली. ते सुखरुप असून रविवारी परतीच्या प्रवासाला निघाले होते. सोमवारपर्यंत ते अमरावतीत पोहोचणार आहेत.-मोहन पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी