अधिक सतर्कतेची गरज; जिल्ह्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्युदर अधिक
अमरावती : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१ नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल २९२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पन्नास किलोमीटरहून अधिक दूर जाऊन रुग्णांना व नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे.
जिल्ह्यातील मेळघाटातील रुग्णांची अधिक गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरू झाली. या लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मार्च ते २ मेपर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मर्यादित आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील मृत्यूचे तांडव
चिखलदरा - ४
भातकुली - ७
दर्यापूर - १३
धारणी - १५
चांदूर बाजार - १५
धामनगांव रेल्वे - १५
अमरावती - १७
नांदगाव खंडेश्वर - १९
अंजनगाव सुर्जी - २०
तिवसा - २२
चांदूर रेल्वे - २३
मोर्शी - ३१
अचलपूर - ३३
वरूड - ५८
बॉक्स
पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक धावाधाव
धारणी तालुक्यातील चिखली, चाकर्दा, सावलीखेडा, हिरापूर, चिंचोना, काटकुंभ, चुरणी अशा गावांतील ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना धारणी, अचलपूर किंवा अमरावतीला यावे लागते. हे अंतर ५० किलोमीटरपेक्षा अधिक आहे. तिथेही बेड मिळाला नाही, तर अन्य तालुक्यांना किंवा अमरावतीला १०० किलोमीटर अंतर कापावे लागते. अन्य काही तालुक्यांतील गावांनाही एवढेच अंतर कापून जावे लागते.
बॉक्स
तालुका ग्रा.प.संख्या बाधित गावे ,कोरोना मुक्त गावे
अमरावती ५९ १७ ४२
भातकुली ४८ १८ ३०
मोर्शी ६७ ४० २७
वरूड ६६ ५५ ११
अंजनगाव ४८ २० २८
अचलपूर ७० ४५ २५
चांदूर रेल्वे ५० ३५ १५
चांदूर बाजार ६७ २७ ४०
चिखलदरा ५३ २५ २८
धारणी ६२ १२ ५०
दर्यापूर ७४ २३ ५१
धामणगाव रेल्वे ६२ ४० २२
तिवसा ४५ १८ २७
नांदगाव ६८ २५ ४३
बॉक्स
जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल आणि उपलब्ध बेड
जिल्ह्यात दोन शासकीय रुग्णालयासह खासगी मिळून २७ कोविड हॉस्पिटल आहेत. यामध्ये आयसीयूचे ५०५ बेड आहेत. ६६६ ऑक्सिजन बेड, ५५३ जनरल बेड, १२५ व्हेंटिलेटर बेड आहेत. १४ तालुक्यांत १५ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत.
कोट
लक्षणे आढळल्यास लगेच कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करून त्यांची तीव्रता वाढतल्यानंतर चाचणी व उपचारासाठी लोक धावाघाव करतात. गंभीर बाधितांच्या अभ्यासाअंती बहुतांश जणांनी उशीर केल्यामुळे त्यांची तीव्रता वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे योग्यवेळी चाचणी व उपचार महत्त्वाचे आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोेग्य अधिकारी