शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सर्व महापालिका क्षेत्रात अनधिकृत इमारतींचे सर्चिंग, धोकादायक इमारतींवर पडणार हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:12 IST

शहरातील अनधिकृत इमारती शोधून काढण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत.

अमरावती : शहरातील अनधिकृत इमारती शोधून काढण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत. सर्चिंग संपल्यानंतर या इमारतींचे 'स्ट्रक्चरल आॅडिट' करण्यात येणार आहे. अशा इमारतींमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेता अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईचा अग्रक्रम ठरविण्याच्या दृष्टीने या इमारतींची वर्गवारी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.राज्यातील अनेक भागांतील अनधिकृत इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असल्याने त्या सर्व इमारती तत्काळ खाली करून तोडणे व्यवहार्य नाही. त्या पार्श्वभूमीवर अशा इमारतींची वर्गवारी बांधकामाच्या दर्जाच्या आधारावर करण्यात यावी व त्यासाठी अनधिकृत इमारतींचे 'स्ट्रक्चरल आॅडिट' करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये ज्या इमारती धोकादायक सिद्ध होतील, त्यातील रहिवाशांना बाहेर काढून त्या इमारती पाडून टाकण्यात याव्यात, तशी अंमलबजावणी सर्व नागरी लोकल बॉडीने करावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.अनधिकृत बांधकामामुळे होणा-या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी या उपायययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामाविरुद्ध सौम्य धोरण असल्याचा गैरफायदा घेत काही बांधकाम व्यावसायिक अनधिकृतपणे बांधकाम करतात, अशा इमारतींमध्ये मुद्दामच काही नागरिकांना वास्तव्यास ठेवून कारवाईपासून बचावाचा पवित्रा घेतात. हे चौकशीदरम्यान उघड झाल्याचे स्पष्ट करीत नगरविकासने सक्त निर्देश दिले आहेत.संकेतस्थळावर बांधकाम प्रकल्पाची यादीसर्व नागरी क्षेत्रात विकास प्रस्तावांतर्गत बांधण्यात येणा-या व बांधलेल्या इमारतींची यादी, सविस्तर विकास प्रकल्प, त्यांची मंजुरी, याबाबत इत्यंभूत माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळावी, याकरिता ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्व नियोजन प्राधिकरणांना देण्यात आले आहे.अनधिकृत बांधकाम करू नकाअनधिकृत बांधकामाची यादी प्रसिद्ध करावी, नागरिकांना आवाहन करून त्याबाबत व्यापक जनजागृती करावी, तसेच स्थानिक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र व होर्डिंग्जच्या माध्यमातून नागरिकांना अनधिकृत इमारतीत घर घेण्यापासून परावृत्त करावे, असे निर्देश न.पा. महापालिकांना देण्यात आले आहे. या आदेशाचे सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सर्व नियोजन प्राधिकरणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.अनधिकृत इमारती शोधून काढण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने झोनस्तरावर या मोहिमेने वेग घेतला असून, अशा मालमत्तांवर दंड आकारणी केली जात आहे. मालमत्ता मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान ही मोहीम राबविली जात आहे.हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती