शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिंचन प्रकल्प तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:21 IST

तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक्के अशी निचांकी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकेत : सिंचनात अडसर, आभाळाकडे डोळे

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक्के अशी निचांकी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात शेकदरी प्रकल्प पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ दलघमी तर ओलित क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पाची जलसंचय क्षमता १००.६० दलघमी, ओलित क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ दलघमी असून ओलित क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ५००.७५ दलघमी, तर ओलित क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० दलघमी, तर ओलित क्षमता १५३ हेक्टर, जामगाव, प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० दलघमी असून, ओलित क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८१.६० दलघमी असून, ओलित क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० दलघमी असून, ओलित क्षमता १२२ हेक्टर , बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० दलघमी असून, ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे. तसेच वघाळ बंधाऱ्याची ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. यावर्षी जलसंचय नसल्याने तहाणलेलेच आहे. यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्र्रश्न उदभवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पिकेसुद्धा सुकायला लागली आहे. यावर्षी केवळ १०४.९९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई