शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसचे आणखी सहा ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:13 IST

जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

ठळक मुद्देएकूण संख्या ४५ : प्रशासन कुंभकर्णी झोपेत

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.सहापैकी चार रुग्ण हे डॉ. मनोज निचत यांच्या राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एक रुग्ण डॉ. राजेश मुंदे यांच्याकडे, तर एक बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बोंडे हॉस्पिटलमध्ये तिवसा तालुक्यातील कुºहा मिर्झापूर येथील एक ३२ वर्षीय महिला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली आहे. तिचे रक्तनमुने व खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, स्क्रब टायफस या आजाराच्या निदानासाठी उपयुक्त असलेली इलायझा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शिरभाते यांनी दिली. राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये कामरगाव (ता. कारंजा) येथील एक २० वर्षीय युवक चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालानांदगाव तालुक्यात तीन रुग्णअमरावती : कामरगावच्या रुग्णाचीसुद्धा इलायझा कन्फर्म आहे तसेच डॉ. मनोज निचत यांच्याकडे ३९ पैकी सर्वाधिक १६ रुग्ण ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे आढळून आले. त्यापैकी एका महिला रुग्ण उपचारादरम्यान दगावली. बुधवारी आणखी चार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला, पाळा येथील ३२ वर्षीय महिला, घारफळ (लोणी) येथील ५० वर्षीय महिला तसेच चंडिकापूर (ता. दर्यापूर) येथील ५० वर्षीय पुरुष रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यापूर्वीसुद्धा जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे १३६ अधिक रुग्ण आढळून आल्याचा शासकीय अहवाल आला होता.खासगी डॉक्टरांकडे अशा रुग्णांची संख्या दहापट अधिक होती. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूबाबत प्रशासनाला सतर्क केले होते. आता अशी स्थिती स्क्रब टायफस या आजारासंदर्भात सुद्धा निर्माण झाली असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सावध होणे गरजेचे आहे.४५ रुग्ण; आरोग्य प्रशासन गप्प का?जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे आतापर्यंत ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांना जीवसुद्धा गमावावा लागला. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने हा विषय पाहिजे तेवढा गांभीर्याने घेतला नाही. ज्या भागात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळून येत आहेत, त्या ठिकाणी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना शून्य आहेत. लोकांचा जीव धोक्यात असताना आरोग्य यंत्रणा कुंभकर्णी झोपेत का, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य